ITR भरत असाल तर गोड बातमी,दंडाची रक्कम निम्म्याने कमी!
With effect from FY 2020-21, a person filing belated ITR will have to pay a penalty of up to 5,000 Rs.
आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी, आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२१ आहे (कोविड मुळे ती ३१ जुलै २०२१ च्या नेहमीच्या मुदतीपासून वाढवण्यात आली होती). गेल्या वर्षापर्यंत जर एखाद्या करदात्याने आयटीआर मुदतीत भरला नसेल तर त्याला जास्तीत जास्त दंड १०,००० रुपये दंड भरावा लागत होता.
सध्या आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून दंडाची रक्कम निम्म्याने कमी करण्यात आली आहे. म्हणजे उशिरा ITR दाखल करणाऱ्या व्यक्तीला ५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. आणि जर तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल आणि मुदतीनंतर तुम्ही तुमचा आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागणार नाही.
तर तुम्हाला दंड भरावा लागेल
२०२१ च्या अर्थसंकल्पात सरकारने ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही अशा व्यक्तींना आयटीआर भरण्यासाठी दिलेला वेळ कमी केला आहे. आयटीआर दाखल करण्याची वेळ मर्यादा कमी केल्यामुळे आयकर कायदा १९६१ च्या कलम 234F मध्ये सुधारणा करण्यात आली, ज्याअंतर्गत विलंब झालेला आयटीआर दाखल करण्यासाठी दंडात्मक रक्कम पूर्वीच्या १०,००० रुपयांपेक्षा कमी करून ५,००० रुपये करण्यात आली आहे.
याआधी, एखाद्या व्यक्तीला आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजेच ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त १०,००० रुपये दंड भरून विलंबित आयटीआर दाखल करण्याची मुदत होती.
या वर्षापासून, विलंबित आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. त्यानुसार, आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी विलंबित आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ होती, परंतु कोविड -19 मुळे ती ३१ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, ३१ जानेवारी २०२२ च्या अंतिम मुदतीपर्यंत विलंबित आयटीआर दाखल करणाऱ्या व्यक्तीला आता जास्तीत जास्त ५,००० रुपये दंड भरावा लागेल.
गेल्या वर्षीपर्यंत आयटीआर अंतिम मुदतीत दाखल न केल्याबद्दल द्विस्तरीय दंडात्मक रचना होती. जर मुदत संपल्यानंतर आणि ३१ डिसेंबर रोजी किंवा त्यापूर्वी विलंबित आयटीआर दाखल केला असेल तर त्या व्यक्तीला ५,००० रुपये लेट फी भरणे आवश्यक होते. जर १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान आयटीआर दाखल केला असेल तर १० हजार रुपये लेट फी आकारली जायची.
आयटीआर फाइलिंगची सेवा देणारे फिनटेक स्टार्टअप होस्टबुकचे संस्थापक आणि अध्यक्ष कपिल राणा म्हणाले, “आर्थिक वर्ष २०१९-२० पर्यंत कलम 234F नुसार,जर करदाता अंतिम मुदतीत ITR दाखल करू शकला तर ५,००० रुपये शुल्क भरावे लागेल. अन्यथा ३१ डिसेंबर नंतर आर्थिक वर्ष २०२०-२१ पासून कर परतावा सादर केल्यास ती रक्कम १०,००० रुपये होईल.
आयटीआर अंतिम मुदतीत दाखल न करणाऱ्या छोट्या करदात्यांवर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर तुम्ही लहान करदाते असाल ज्यांचे एकूण उत्पन्न FY च्या दरम्यान ५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तर अंतिम मुदत संपल्यानंतर (म्हणजे ३० सप्टेंबर,) कोणत्याही वेळी ITR दाखल झाल्यास तुम्हाला कमाल शुल्क १००० रुपये भरावे लागेल.
Comments are closed.