चला अजून एक IPO येणार! ‘ ही ‘ फर्म आहे तयारीत

The Rs 6,017.5-crore IPO will comprise a fresh issue of shares worth Rs 3,750 crore and an offer for sale of Rs 2,267.5 crore.

नॅशनल मार्केट्स वॉचडॉग सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) पॉलिसी बाजार फिनटेकला त्यांचा पब्लिक इश्यू जारी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

6,017.5 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 3,750 कोटी रुपयांच्या शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 2,267.5 कोटी रुपयांच्या विक्रीची ऑफर असेल .विक्रीसाठी ऑफरमध्ये एसव्हीएफ पायथन II (केमॅन) चे 1,875 कोटी रुपयांचे शेअर्स आणि इतर स्टेकहोल्डरकडून 392.5 कोटी रुपयांचे शेअर्स उपलब्ध होतील.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी हे या इश्यूचे व्यवस्थापक असतील. DRHP नुसार सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, ICICI सिक्युरिटीज, HDFC बँक, IIFL सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया हे ऑफरसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.

कंपनी विसिबिलिटी आणि ब्रँड अवरेनेस वाढविण्यासाठी,1500 कोटी खर्च करेल. रणनीतीक गुंतवणुकीसाठी 600 कोटी रुपये, भारताबाहेर उद्योग वाढवण्यसाठी 375 कोटी रुपये आणि इतर सामान्य कॉर्पोरेट हेतू साठी वापरेल.

पीबी फिनटेकने विमा आणि कर्ज देणाऱ्या उत्पादनांसाठी भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन व्यासपीठ तयार केले आहे , जे फ्रॉस्ट अँड सुलिवानच्या मते, ते तंत्रज्ञान, डेटा आणि नावीन्यपूर्ण शक्तीचा लाभ घेत आहे .

कंपनीने 2008 मध्ये पॉलिसीबाजार हे प्रमुख व्यासपीठ सुरू केले. FY20 मध्ये, पॉलिसीबाजार हे भारतातील सर्वात मोठे डिजिटल विमा मार्केटप्लेस होते, जे विक्री केलेल्या पॉलिसींच्या संख्येवर आधारित 93.4 टक्के मार्केट शेअर होते.

मार्च 2021 पर्यंत 4.8 कोटी ग्राहकांनी पॉलिसीबाजार प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे आणि 1.9 कोटीहून अधिक पॉलिसी विमा पार्टनरकडून खरेदी केल्या आहेत. FY21 मध्ये, पॉलिसीबझार वेबसाइटवर विसीट वार्षिक संख्या 12.65 कोटी होती.

Comments are closed.