अजून एक IPO झाला लाँच! प्राइज बँड, इश्यू साइझबद्दल – वाचा सविस्तर
Policybazaar IPO launch date announced: Price band, other details here
ऑनलाइन प्लॅटफॉर्म पॉलिसीबझारने त्यांच्या IPO साठी 940-980 प्रती शेअरची किंमत सेट केली आहे. याआधी मंगळवारी फर्मने सांगितले की, त्यांचा IPO 1 नोव्हेंबरला ओपन होइल आणि 3 नोव्हेंबरला बंद होईल. फर्म 15 नोव्हेंबरला लिस्टिंग करण्याची योजना आखत आहे.
फर्म IPO मधून सुमारे 5,709.72 कोटी उभारण्याचा विचार करत आहे , ज्यामध्ये 3,750 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 19,59.72 कोटींची ऑफर फॉर सेल आहे .
OFS मध्ये SVF Python द्वारे 1.875 कोटी, यशिष दहिया 30 कोटी, आलोक बन्सल 12.75 कोटी, शिखा दहिया यांनी 12.50 कोटी आणि राजेंद्र सिंग यांनी 3.50 कोटी रुपये गुंतवले आहे. कंपनीचे संस्थापक युनायटेड ट्रस्ट सुमारे 268,000 शेअर्सची विक्री करेल.
सध्या, SVF Python II (केमन) कडे 9.45%, यशिश दहिया 4.27% आणि आलोक बन्सल यांच्याकडे 1.45% स्टेक आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅनले, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, ICICI सिक्युरिटीज, HDFC बँक लि., IIFL सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
1,500 कोटी किमतीच्या इश्यूमधून मिळणारे एकूण उत्पन्न पॉलिसीबझार आणि पैसाबाजारसह त्यांच्या ब्रँडची विसिबीलिटी आणि अवेरनेस वाढविण्यासाठी वापरले जाईल. 375 कोटी रूपये उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी येणाऱ्या नवीन संधींसाठी वापरले जाईल. 600 कोटी धोरणात्मक गुंतवणुकीसाठी आणि 375 कोटी भारताबाहेर विस्तारासाठी वापरला जाईल.
Comments are closed.