RBI ने ‘ ह्या ‘ फर्मला ठोठावला 1 कोटीचा दंड, ‘ हे ‘ आहे नेमके कारण

RBI imposes Rs 1 crore penalty on Paytm Payments Bank

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 ऑक्टोबर रोजी म्हटले आहे की, बँकेने, उल्लंघनांसाठी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर एक कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

आरबीआयने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, सदर उल्लंघन हे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट, 2007 (PSS अॅक्ट) च्या कलम 26 (2) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाच्या गुन्ह्याशी संबंधित आहे.

RBI ने अंतिम प्रमाणपत्र जारी करण्यासाठी पेटीएम पेमेंट बँकेच्या अर्जाची तपासणी करताना, असे निरीक्षण केले की पीपीबीएलने अशी माहिती सादर केली आहे, जी वास्तविक स्थिती प्रतिबिंबित करत नाही.

“पीएसएस कायद्याच्या कलम 26 (2) मध्ये नमूद केलेल्या स्वरूपाचा हा गुन्हा असल्याने, पीपीबीएलला नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने वेस्टर्न युनियन फायनान्शिअल सर्व्हिसेसवर 27.8 लाख रुपयांचा दंड लावला आहे, मनी ट्रान्सफर सेवा योजनेतील तरतुदींचे पालन न केल्यामुळे सदर दंड ठोठावला आहे.

वेस्टर्न युनियनच्या बाबतीत, आरबीआयने म्हटले आहे की, कंपनीने 2019 आणि 2020 मध्ये प्रति लाभार्थी 30 पैसे पाठवण्याच्या मर्यादेचे उल्लंघन केले होते.

आरबीआयने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन न केल्याने आर्थिक दंड लावण्यात आला.

ही कारवाई नियमांचे पालन न केल्यामुळे करण्यात आली आहे, असे आरबीआयने सांगितले.

Comments are closed.