आनंदाची बातमी – आता बँक हॉलिडेच्या दिवशीसुद्धा जमा होणार पगार

NACH will be available on Sundays and on Bank Holidays

देशभरातील नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता पगाराच्या दिवशी रविवार असेल किंवा बँक हॉलिडे असेल तरीही पगार जमा होणार आहे. रिझर्व्ह बँकेने नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार नॅशनल ऑटोमेटेड क्लीअरिंग हाऊस म्हणजेच NACH आता रविवार आणि बँक हॉलिडेजना सुरु असणार आहे. याची अंलबजावणी १ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होईल. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत आज घोषणा केली.

यामुळे १ ऑगस्टपासून तुमचा पगार रविवारी किंवा बँक हॉलिडेच्या दिवशी जमा होण्याबरोबरच तुमच्या कर्जाचे हफ्ते, म्युच्युअल फंडांच्या एसआयपीचे हफ्ते, टेलिफोन बिल, गॅस बिल, वीज बिल यांसारखी बिलेसुद्धा अकाऊंटमधून कापली जातील. सध्या ग्राहक एखादे बिल भरण्यासाठी ऑटो डेबिट सुविधा वापरत असतील तर रविवार, बँक हॉलिडे या दिवशी हे ट्रान्झॅक्शन होत नाही. तसेच बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार बँक हॉलिडेच्या दिवशी करत नाहीत.

आता ऑगस्ट महिन्यापासून सर्व ग्राहकांना आपल्या अकाऊंटमध्ये बॅलन्स ठेवावा लागणार आहे. कर्जाचा हफ्ता किंवा बिलाचे ऑटो डेबिट रविवार होणार नाही अशा संभ्रमात राहिल्यास त्याचा दंड भरावा लागू शकतो. हा निर्णय ग्राहकांच्या हितासाठी घेतला असल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. नॅशनल ऑटोमेटेड क्लीअरिंग हाऊस ही एक बल्क पेमेंट सुविधा असून एकाच अकाऊंटमधून अनेक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी तिचा वापर केला जातो.

Comments are closed.