आता मोबाईलवरून फाईल करा इन्कम टॅक्स रिटर्न

Taxpayers Can File income Tax returns from mobile phones

देशभरातील टॅक्स भरणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आजवर इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची प्रक्रिया वेबसाईटवरून करावी लागत असे. आता हे तुमच्या मोबाईलवरून करणे शक्य होणार आहे. इन्कम टॅक्स ई-फायलिंग आता मोबाईल ऍपद्वारे करता येईल. हे मोबाईल ऍप १८ जून २०२१ पासून सर्वांना उपलब्ध होईल. इन्कमटॅक्स इंडियाच्या ट्विटर हॅंडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

इन्कम टॅक्स ई-फायलिंगचे नवे वेब पोर्टल आणि मोबाईल ऍप हे सगळ्यांना वापरता यावे अशा हेतूने बनवले आहे असे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून सांगण्यात आले. यावरून टॅक्स भरणाऱ्यांना आयटीआर फॉर्म, सरल इन्कम टॅक्स सुविधा याची माहिती मिळू शकणार आहे. हे नवे पोर्टल ७ जून २०२१ पासून कार्यान्वित होणार आहे. या नव्या वेब पोर्टलची हायपरलिंक आता www.incometax.gov.in अशी असणार आहे.

इन्कम टॅक्स वेब पोर्टलवर जे फीचर्स उपलब्ध आहेत ते मोबाईल ऍपवरदेखील उपलब्ध असणार आहेत. हे मोबाईल ऍप इतर ऍपसारखेच वापरणे शक्य होणार आहे.

Comments are closed.