संसेरा इंजिनिअरिंगला मिळाली इतकी लिस्टिंग,पाहा तज्ञांचे काय आहे मत
Sansera Engineering lists at 9% premium over issue price of Rs 744
संसेरा इंजिनिअरिंग 24 सप्टेंबर रोजी 811.50 रुपयांला लिस्टिंग झाला आहे. या आयपीओ ची इश्यू किंमत 744 रुपये प्रति शेअर होती. लिस्टिंगला इश्यू किंमतीला 9 टक्के प्रीमियम मिळाला आहे. बीएसईवर हा शेअर 811.35 रुपयांवर होता, तर एनएसइ वर हा शेअर 811.50 रुपये होता.
14 ते 16 सप्टेंबर दरम्यान 1,283 कोटी रुपयांचा ह्या IPO ला 11.47 वेळा सबस्क्रिप्शन मिळाले होते. तर 13.18 कोटी इक्विटी शेअर्ससाठी 1.21 कोटी शेअर्सच्या बोली लागली होती.
पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी सगळ्यात जास्त बोली लावली होती. त्यांनी 9.06 कोटी शेअर्स खरेदी केले, जे एकूणच 26.47 पट होते. रिटेल गुंतवणूकदारांनी 3.15 वेळा आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 11.37 वेळा सदस्यता घेतली.
संसेरा इंजिनिअरिंगचा IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर केला होता. त्यामुळे इश्यूमधून मिळणारी सर्व रक्कम विक्री करणाऱ्या शेअरहोल्डरकडे जाईल.
कंपनीने आपल्या पब्लिक इश्यूद्वारे 1.72 कोटीहून अधिक इक्विटी शेअर्स उपलब्ध केले. ऑफरची किंमत बँड 734-744 रुपये प्रति शेअर होती.
संसेरा इंजिनिअरिंग हे इंटिग्रेटेड उत्पादक आहे ज्यात ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील घटकांचा समावेश होतो. कंपनी लाईट व्हेइकल सेगमेंट आणि कमर्शियल व्हेइकल सेगमेंटमध्ये कनेक्टिंग रॉड्सच्या टॉप 10 जागतिक पुरवठादारांपैकी एक आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजनुसार संसेरा इंजिनिअरिंग पुढील काही वर्षांमध्ये ऑटोमोबाईल व्हॉल्यूममध्ये जास्त वाढ करण्याची शक्यता आहे.रिलायन्स सिक्युरिटीजने हा इश्यू लाँग टर्म साठी योग्य असल्याचा दावा केला आहे.
FY21 मध्ये, संसेरा इंजिनीअरिंगने 109.86 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो FY20 मध्ये 79.9 कोटी होता. याच कालावधीत महसूल 1,457.17 कोटी रुपयांवरून 1,549.27 कोटी रुपये झाला आहे.
आर्थिक वर्ष 21 साठी, कंपनीने 88.45 टक्के महसूल ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील उत्पादनांच्या विक्रीतून आणि उर्वरित 11.55 टक्के नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रातून मिळवला.
Comments are closed.