क्रिप्टो करंसीचे व्यवहार करणाऱ्यांना एसबीआय, एचडीएफसीचा इशारा, अकाऊंट करणार ब्लॉक 

Banks have warned the customers dealing in crypto currency

तुम्ही जर क्रिप्टो करंसीच्या व्यवहारांसाठी एसबीआय किंवा एचडीएफसीचे बँक अकाऊंट वापरत असाल तर तुमचे अकाऊंट बँकेकडून बंद केले जाऊ शकते. या बँकांकडून आपल्या ग्राहकांना अशा आशयाचे ईमेल पाठवण्यात येत आहेत. यासाठी बँकांकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून २०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्क्युलरचा आधार घेतला जात आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने मार्च २०२० मध्ये हे सर्क्युलर रद्दबातल ठरवले होते.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत सावधानता म्हणून ईमेल पाठवला आहे.  क्रिप्टो करंसीच्या व्यवहाराबाबत अजून फारशी स्पष्टता नसल्याने बँकांनी हे पाऊल उचलले आहे. याबाबत ‘तुमच्या अकाऊंटमध्ये क्रिप्टो करंसीशी निगडित ट्रान्झॅक्शन झाल्याचे दिसत आहे. आरबीआयकडून असे व्यवहार करण्याला बंदी आहे.’ अशा आशयाचा ईमेल बँकाकडून पाठवण्यात आला आहे. तर काही ग्राहकांना जवळच्या ब्रँचमध्ये जाऊन हे ट्रान्झॅक्शन कशाशी निगडित आहेत याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

क्रिप्टो करंसीबाबत आरबीआयने घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक बँका आपल्या ग्राहकांना याबाबत सतर्क करत आहेत. तसेच वझीर एक्स, कॉइन डीसीएक्स, झेब पे सारख्या क्रिप्टो एक्सचेंजवरील व्यवहार आपल्या बँकेतून होणार नाहीत याकडे बँका लक्ष देत आहेत. आरबीआयच्या भूमिकेमुळे बँकांना हे नियम पाळावे लागत आहेत. याचमुळे गेल्या काही आठवड्यात क्रिप्टो करंसी व्यवहारासाठी आयसीआयसीआय किंवा एचडीएफसी बँकेचे अकाउंट वापरणाऱ्या युजर्सना आपल्या क्रीप्टो अकाउंटमधून पैसे काढणे किंवा पैसे डिपॉझिट करणे जमलेले नाही.

Comments are closed.