टाटा मोटर्सचे CNG सेक्टरमध्ये आगमन! केल्या ‘या’ कार लॉन्च
टाटा मोटर्सने CNG कार लॉन्च करत सीएनजी मार्केटमध्ये आपले स्थान मजबूत करण्याकडे एक पाऊल टाकले आहे.
टाटा मोटर्सने CNG कार लॉन्च करत सीएनजी मार्केटमध्ये आपले स्थान मजबूत करण्याकडे एक पाऊल टाकले आहे.
बुधवारी Tata Motors ने Tiago आणि Tigor trims या दोन CNG कार लाँच करून CNG सेगमेंटमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. सदर कारची किंमत अनुक्रमे 6.09 लाख आणि 8.41 लाख रुपये आहे.
Tiago iCNG कारची किंमत 6.09 लाख ते 7.64 लाख दरम्यान आहे तर Tigor iCNG अनुक्रमे 7.69 लाख, 8.29 लाख आणि 8.41 लाखात उपलब्ध आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र यांनी सांगितले की, “CNG सेक्टरमध्ये भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन आम्ही टियागो आणि टिगोर ही दोन मॉडेल्स लाँच केले आहेत.
ते म्हणाले, “गेल्या काही वर्षांत CNG गाड्यांची मागणी भरपूर वाढली आहे. 2019 मध्ये सीएनजी कारची विक्री सुमारे 60 टक्क्यांनी वाढली आहे. तर या आर्थिक वर्षात हीच मागणी 97% झाली आहे. याचे मुख्य कारण पेट्रोल-डिझेलचे वाढते भाव हे आहे.
भारतभर सीएनजी स्टेशनच्या नेटवर्कमध्ये होणारी वाढ हे याचेच उदाहरण आहे.
“CNG साठी आधीच 3,500 आउटलेट्स आहेत आणि सरकारने पुढील काही वर्षांत 10,000 स्टेशन्सचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे एक चांगले वातावरण तयार झाले आहे, असे चंद्रा म्हणाले.
Comments are closed.