फर्टिलायझर सेक्टरमधील ‘हा’ स्टॉक देऊ शकतो चांगला परतावा

दिपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कार्पोरेशन लिमिटेड – CMP 569
(Deepak Fertilisers and Petrochemicals Corp Ltd. – DEEPAKFERT)

भारतातील काही आघाडीच्या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांपैकी एक टेक्निकल अमोनिअम नायट्रेट, इंडस्ट्रिअल केमिकल्स, क्रॉप न्यूट्रिशन हे प्रमुख प्रॉडक्टस एक्सप्लोझीव्ह, मायनिंग, हेल्थकेअर आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये कंपनीच्या प्रॉडक्टसचा उपयोग केला जातो.

 

 • नायट्रो फॉस्पेट २४:२४:० हे फर्टिलायझर बनवणारी भारतातील एकमेव कंपनी
 • नायट्रिक ऍसिडचे भारत आणि दक्षिण आशियातील सर्वात जास्त प्रॉडक्शन घेणारी कंपनी
 • आयसो प्रॉपिल अल्कोहोल मार्केटमध्ये ६५% मार्केट शेअर
 • बेंटोनाइट सल्फरचे सर्वात जास्त प्रॉडक्शन घेणारी कंपनी
 • स्पेशालिटी आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सेक्टरमध्ये भारतातील मार्केट लीडर
 • सॉलिड फॉर्ममध्ये टेक्निकल अमोनिअम नायट्रेटचे प्रॉडक्शन करणारी एकमेव कंपनी, बाकी कंपन्या लिक्विड फॉर्ममध्ये हे प्रॉडक्शन करतात

 

 • फार्मा, पेंट्स. कोटिंग्ज, स्टील, इंक, एक्सप्लोझीव्ह, या सेक्टर्ससाठी इंडस्ट्रिअल केमिकल्सचा पुरवठा
 • दहेज आणि तळोजा येथे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिडचे प्लांट्स, या मार्केटमध्ये ७०% शेअर
 • दहेज, तळोजा आणि श्रीकाकुलम येथे डायल्यूटेड नायट्रिक ऍसिडचे प्लांट्स, या मार्केटमध्ये ३०% शेअर
 • नायट्रिक ऍसिडची मागणी येणाऱ्या काळात सप्लायपेक्षा जास्त होऊ शकते.

 

 • तळोजा येथे आयसो प्रॉपिल अल्कोहोलचा प्लांट, या सेक्टरच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगमध्ये कंपनीचा ६५% मार्केट शेअर
 • फार्मा ग्रेड आयसो प्रॉपिल अल्कोहोल प्रॉडक्शन करणारी आणि इंडिया फार्माकोपियाला कंप्लायंट असणारी दीपक फर्टिलायझर ही एकमेव कंपनी आहे
 • फार्मा सेक्टरमधून आयसो प्रॉपिल अल्कोहोलला अजूनही भरपूर डिमांड आहे. यामध्ये सॅनिटायझर बिझनेस फक्त १०-१५% एवढा आहे. म्हणजे ही डिमांड अशीच राहू शकते.

 

 • तळोजा आणि श्रीकाकुलम येथे टेक्निकल अमोनिअम नायट्रेटचे प्लांट्स, या मार्केटमध्ये ४५% वाटा
 • २०२५ पर्यंत कंपनी ३,७६,००० प्रति वर्षी मेट्रिक टन एवढे प्रॉडक्शन घेऊ शकेल असा प्लांट उभारते आहे. त्यासाठी २२०० कोटींची तरतूद केली आहे.
 • यामुळे कंपनीचा समावेश ग्लोबल टॉप ३ कंपन्यांमध्ये होऊ शकेल.
 • टेक्निकल अमोनिअम नायट्रेटच्या व्हॉल्यूममध्ये १०% CAGR  ने वाढ होते आहे.
 • गोपालपूर येथे कंपनी नवा प्लांट सुरु करत आहे. त्याचे लोकेशन पूर्व आणि मध्य भारताला लागून आहे जिथे बऱ्यापैकी मायनिंग होते. त्यासाठी लागणारे एक्सप्लोझीव्ह केमिकल्सची मागणी त्यामुळे वाढू शकते. दीपकच्या तीनही स्पर्धक कंपनीचे पूर्व भारतात प्लांट्स आहेत. त्यामुळे दीपकचा हा प्लांट एक चांगली मूव्ह ठरू शकेल.
 • सरकारकडून इन्फ्रास्ट्रक्चर, कोल आणि सिमेंट सेक्टरला बऱ्यापैकी पाठबळ दिले जात आहे. या सगळ्यामुळे कंपनीच्या प्रॉडक्टसची मागणी वाढू शकते.

 

 • तळोजा येथे कंपनीचा अमोनिया प्लांट आहे. या प्लांट्चे सध्या एक्सपान्शन सुरु आहे आणि २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ते पूर्ण होईल. सध्या कंपनी अमोनिया इम्पोर्ट करते. स्वतःचा प्लांट कमिशन झाल्यावर कंपनी इम्पोर्टसाठी होणारा खर्च येणाऱ्या १० वर्षांत २५,००० कोटींनी कमी करू शकते. याशिवाय हा प्लांट कंपनीसाठी रेव्हेन्यू निर्माण करेलच.

 

 • क्रॉप न्यूट्रिशन बिझनेस – तळोजा येथे नायट्रोजन फॉस्फरसचा प्लांट. यासोबत पोटॅशिअम फर्टिलायझरचा आणि बेंटोनाईट सल्फरचा प्लांट
 • कंपनीचे स्मार्टटेक आणि क्रॉपटेक हे दोन प्रॉडक्टस बाजारात प्रसिद्धी मिळवत आहेत.
 • स्मार्टटेकचे मार्केटिंग कंपनीने २५००० प्लॉट निवडून त्यात प्रॉडक्टचा वापर केला आहे.
 • याशिवाय २७० हुन अधिक मार्केट डेव्हलपमेंट ऑफिसर्सची नियुक्ती केली आहे. ते शेतकऱ्यांशी थेट संवाद साधतील. यामुळे मार्केट शेअर वाढण्यास मदत झाली तसेच हाय मार्जिन प्रॉडक्टस विकण्यासाठी हातभार लागला.

 

 • कंपनीसमोर असलेली आव्हाने – अमोनिया हे नॅचरल गॅसचे बाय प्रॉडक्ट आहे. गॅस सप्लाय करणाऱ्या कंपन्यांकडून यावर नियंत्रण आले, किंमत वाढवली गेली तर ते दीपक साठी डोकेदुखी ठरू शकते.
 • सध्या सुरू असलेले प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यात आणखी उशीर झाला तर त्याचा थेट परिणाम कंपनीच्या बॅलन्सशीटवर होऊ शकतो.
 • हे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी कंपनीने आणखी डेट उभारले तर त्याचा परिणाम अर्निंग्ज रेशोवर होऊ शकतो.

 

स्टॉकने डेली चार्टवर ब्रेक आऊट दिल्या नंतर रिटेस्ट केला आहे. स्टॉक ५% सर्किट मध्ये असल्याने एन्ट्री घेता येणे थोडे अवघड असले तरी सर्किट ओपन झाल्यावर तुम्ही बाय चा विचार करू शकता. तसेच तुम्ही डीप मध्ये बाय करू शकता. स्टॉक ७५० ची लेव्हल सुद्धा टेस्ट करू शकतो. सद्ध्या स्टॉक ऑल टाइम हाय ला ट्रेड करत आहे.

 

हा फक्त कंपनी आणि तिच्या प्रॉडक्टसबद्दल माहिती देणारा लेख आहे. हा गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्की चर्चा करा.

 

 

Comments are closed.