एलआयसी आयपीओचा थेट परिणाम होणारे चार घटक

एलआयसीचा आयपीओ लवकरच मार्केटमध्ये येणार आहे. या आयपीओची साईज साधारण ५३,००० ते ९३,००० कोटींच्या घरात असेल असा अंदाज अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. हा आयपीओ भारतीय मार्केटमधील सर्वात मोठा असेल. तुम्ही एलआयसीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू, पण या  आयपीओचा थेट परिणाम होऊ शकतील असे चार घटक या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

१. CDSL – एलआयसीने आपल्या आयपीओमध्ये १०% कोटा आपल्या पॉलिसीहोल्डर्ससाठी राखीव ठेवला आहे. यातले बरेच लोक असे असणार आहेत की जे पहिल्यांदा डिमॅट अकाऊंट ओपन करतील. कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांचे साधारण २९ कोटी पॉलिसीहोल्डर्स आहेत. आयपीओला अप्लाय करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे बंधनकारक आहे. भारतात सध्या CDSL आणि  NSDL या दोनच डिपॉझिटरी आहेत. या दोन्हींपैकी फक्त CDSL ही एकच लिस्टेड कंपनी आहे. CDSL कडे सध्या जवळपास ५.८ कोटी इन्व्हेस्टर अकाऊंट्स आहेत. एलआयसी आयपीओच्या निमित्ताने २९ कोटींपैकी २०-३०% लोकांनी डिमॅट अकाऊंट ओपन केले आणि त्यातला निम्मा वाटा CDSL ला मिळाला तरी हा आकडा २ कोटी ९० लाख ते ४ कोटी ३५ लाखांच्या घरात असू शकेल.

२. शेअर ब्रोकर्स – आयपीओला अप्लाय करताना भलेही ब्रोकर अकाऊंट लागत नसेल. पण जर आयपीओची अलॉटमेंट मिळाली आणि ते शेअर्स विकायचे असतील तर तुम्हाला ब्रोकरची गरज लागतेच लागते. या आयपीओच्या निमित्ताने ब्रोकर्सला बरेच नवे कस्टमर्स मिळतील. या कस्टमर्सला हे ब्रोकर्स आपली इतर प्रॉडक्टसदेखील विकू शकतील.

३. इंश्युरन्स कंपन्या – एलआयसी आयपीओच्या निमित्ताने भारतातील इंश्युरन्स सेक्टरला नव्याने बूस्ट मिळू शकतो. एलआयसी जरी मार्केट लीडर असले तरी इतर कंपन्याना या बूस्टचा चांगला फायदा मिळू शकेल.

 

४. इंडेक्सवरील परिणाम – निफ्टी ५० इंडेक्समधील कंपन्यांचे वेटेज हे त्या त्या कंपनीचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे यावरून ठरवले जाते. म्हणजेच कंपनीत नॉन प्रमोटर होल्डिंग किती आहे यावरून ठरवले जाते. ज्यावेळी एलआयसीचे लिस्टिंग होईल तेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन नुसार ती भारतातील पहिल्या तीन कंपन्यांमधील एक कंपनी असेल. त्यामुळे एलआयसीचा समावेश जर इंडेक्समध्ये करायचा झाला तर इंडेक्स वेटेजची रिअलाइनमेंट करावी लागेल आणि सगळ्यात कमी वेटेज असलेल्या कंपन्या इंडेक्समधून बाहेर पडतील.

Comments are closed.