एअर इंडिया स्वगृही! टाटा सन्सने जिंकली बोली

Tata Sons have emerged as the winning bidder for Air India

ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा सन्सने एअर इंडियासाठी बोली जिंकली आहे. यामुळे एयर इंडिया आता टाटा सन्स कडे हस्तांतरीत होइल.

मंत्र्यांच्या पॅनेलने विमान कंपनी ताब्यात देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षा आहे.

दरम्यान, याअगोदर मिळालेल्या माहितीनुसार टाटा सन्स बोलीसाठी आघाडीवर होते. टाटांनी एअर इंडियासाठी सर्वाधिक बोली लावली होती.

एअर इंडियाच्या विक्रीतून मिळणारी कमाई सरकारच्या एकूण अर्थसंकल्पातील तूट भरून काढण्यासाठी आणि कोवीडमुळे प्रभावित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उत्पन्नाचे महत्त्वपूर्ण स्त्रोत ठरेल.

एअरलाइनला ऑफलोड करण्याचे यापूर्वीचे दोन प्रयत्न अयशस्वी झाले होते. 2001 मध्ये सिंगापूर एअरलाइन्स लि.ने एअर इंडियातील हिस्सेदारीसाठी प्रयत्न केले, याशिवाय 2018 मध्ये, इंडिगोने देखील प्रयत्न केल होते.

वाढते कर्ज आणि तोटा असूनही, एअर इंडियाकडे काही फायदेशीर मालमत्ता आहेत, ज्यात लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील मौल्यवान स्लॉट्स, 100 हून अधिक विमानांचा ताफा आणि हजारो प्रशिक्षित वैमानिक आणि क्रू यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय वाहकाबाबत टाटांचा इतिहास मोठा आहे. जेआरडी टाटा यांनीच एअरलाइन्सची स्थापना केली. कंपनीने 1932 साली एअरलाइन्सची स्थापना केली होती.

Comments are closed.