कर्मचाऱ्यांची अशी काळजी घेणारी कंपनी फक्त ‘टाटा’च असू शकते..देणार ६० व्या वर्षापर्यंत पगार 

Tata Steel to offer support to the family members of deceased employees

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात सध्या चिंतेचे वातावरण आहे. आधीच्या लाटेपेक्षा ही लाट जास्त गंभीर आहे आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. या लाटेत देशातील अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वाटेल ते करणाऱ्या टाटा ग्रुपमधील एक कंपनी टाटा स्टील आता याचमुळे चर्चेत आहे.

कोव्हीडमुळे मृत झालेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूसमयी असलेला पगार ६० वय वर्षांपर्यंत सुरु राहील असे कंपनीने जाहीर केले आहे. कुटुंबियांना सर्व वैद्यकीय सुविधा आणि राहण्याची व्यवस्थादेखील कंपनीकडून करण्यात येणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च टाटा स्टील करणार आहे.

टाटा ग्रुप आणि त्यांच्या दातृत्वाच्या कहाण्या नेहमीच चर्चेत असतात. याआधीदेखील टाटा ग्रुपकडून ६० क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स आयात करण्यात आली होते. फक्त टाटा स्टील या एका कंपनीकडून दिवसाला ९०० मेट्रिक टन ऑक्सिजन कंपनीकडून उपलब्ध करून दिला गेला होता. टाटा ग्रुपचा भाग असलेली इंडियन हॉटेल्स या कंपनीने आपल्या हॉटेल्सचे रूपांतर कोव्हीड वॉर्डमध्ये केले होते. या हॉटेल्समधून आणि टाटा ट्रस्टकडून कंपनीने सरकारला ३००० कोव्हीड बेड उपल्बध करून दिले होते.

Comments are closed.