‘ही’ स्टार्टअप ठरू शकते भारतातील पहिली लिस्टेड रिटेल फार्मसी
If everything goes well, MedPlus can become India's first ever listed retail pharmacy chain
सध्या भारतात आयपीओजचा हंगाम सुरु आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या ७-८ महिन्यांत अनेक कंपन्यांचे आयपीओ आले. येणाऱ्या काळातही भारतीय बाजारात अनेक कंपन्या निधी उभारण्यासाठी आयपीओ घेऊन येत आहेत. यात आता मेडप्लस या कंपनीची भर पडणार आहे. असे झाल्यास स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग होणारी रिटेल फार्मसी क्षेत्रातील ही पहिली भारतीय कंपनी ठरेल.
मेडप्लस या आयपीओमधून २००० कोटी रुपये उभे करणार आहे. आपल्या आयपीओसाठी सल्लागार म्हणून कंपनीने ऍक्सिस कॅपिटल, नोमुरा आणि एडलवीज फायनान्शियल सर्व्हिसेस या तीन कंपन्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे. लवकरच कंपनी आणखी एका सल्लागाराची नेमणूकदेखील करणार आहे. या आयपीओमधून उभ्या राहिलेल्या रकमेचा वापर कंपनी आपले डेट कमी करणे तसेच प्रेमजी इन्व्हेस्ट आणि वॉरबर्ग पिंकस या आपल्या गुंतवणूकदारांना कंपनीतून बाहेर पडण्याची संधी देणे यासाठी करणार आहे.
भारतभरात मेडप्लसची एकूण १८०० दुकाने असून रोजची ग्राहकसंख्या ३ लाखांच्या आसपास आहे. याबरोबरच कंपनी आपले ऑनलाईन स्टोअर मेडप्लस स्मार्ट, मेडप्लस पॅथलॅब्ज आणि राईटक्युअर (सर्जिकल प्रॉडक्ट्स) देखील चालवते. मार्च २०२१ अखेरीस कंपनीला १०० कोटींचा नफा झाला होता. कंपनीचे १०००० हून अधिक कर्मचारी आहेत. सुरुवातीला दक्षिण भारतावर लक्ष असलेल्या या कंपनीने गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगाल, ओरिसा, महाराष्ट्रामध्ये आपला व्यवसाय विस्तार केला आहे. अपोलो फार्मसी, नेटमेड्स, फार्मइझी या कंपन्या मेडप्लसच्या स्पर्धक कंपन्या आहेत.
Comments are closed.