छोटा पॅकेट, बडा धमाका

Increasing promoter stake, zero debt, healthy orderbook make this company a good candidate for investment

मीरा इंडस्ट्रीज नावाच्या एका छोट्या कंपनीने गेल्या आठवडयात लक्ष वेधून घेतले. सुरतमधील ही कंपनी टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी लागणारी यार्न ट्विस्टिंग मशिन्स बनवते. कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सची मोठ्या प्रमाणात निर्यात करते. कंपनीचे ग्राहक अमेरिका, आफ्रिका, युरोपातील २० हुन अधिक देशांमध्ये पसरलेले आहेत. कंपनी ट्विस्टिंग मशिन्सबरोबरच वाईंडर मशिन्स, कार्पेट केबलरसारखे मशीनसुद्धा बनवते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कंपनीचे डिझाईन, रिसर्च अँड डेव्हलमेंट हे विभाग इनहाऊस आहेत. कंपनीचे अमेरिकेत एक छोटे मॅन्युफॅक्चरिंग युनिटदेखील आहे.

कंपनी बीएसईवर लिस्टेड असून सध्याची किंमत १०१ रुपये एवढी आहे. ह्या कंपनीकडे लक्ष जाण्याची कारणे –

गेल्या काही महिन्यांत कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाल्या आहेत. यापैकी बऱ्याचश्या ऑर्डर्स या भारताबाहेरील ग्राहकांच्या आहेत. बीएसईला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला खालील मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

१४ जून २०२१ – १,५९,००० डॉलर्स (टर्की)

११ मे २०२१ – १,९१,००,००० रुपये

२६ एप्रिल २०२१ – ३,४५,००,००० रुपये

२ एप्रिल २०२१ – १,१४,००० डॉलर्स (होंडुरास)

२ एप्रिल २०२१ – ६३,००,००० रुपये

८ मार्च २०२१ – १,८०,००० डॉलर्स  (टर्की)

२७ जानेवारी २०२१ – २,९५,००,००० रुपये

२० जानेवारी २०२१ – १,७१,००० डॉलर्स (ब्राझील आणि होंडुरास)

२० जानेवारी २०२१ – ९४,००,००० रुपये

वरील आकडेवारी पाहता कंपनीकडे डोमेस्टिक मार्केटमधील जवळपास १० कोटी तर ओव्हरसीज मार्केटमधील जवळपास ४ कोटी ७० लाखांच्या ऑर्डर्स आहेत. म्हणजे कंपनीचे ऑर्डरबुक तरी हेल्दी दिसते आहे. या ऑर्डर्समध्ये छोट्या ऑर्डर्स धरलेल्या नाहीत. या वर्षाचे सहा महिने अजून बाकी आहेत. या सहा महिन्यांत कंपनीला आणखी ऑर्डर्स मिळू शकतात.

कंपनीच्या प्रमोटर्सकडे कंपनीचे ६४.१८% शेअर्स आहेत. मार्च २०२१ च्या तिमाहीत प्रमोटर्सने आपला स्टेक काही प्रमाणात वाढवला आहे. कंपनीकडे असलेल्या मोठ्या ऑर्डर्समुळे येणाऱ्या काळात चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवून प्रमोटर्सने आपला स्टेक वाढवला असू शकतो. प्रमोटर्सचे शेअर्स प्लेज केलेले नाहीत ही आणखी एक जमेची बाब आहे. कंपनी पूर्णपणे डेट फ्री आहे. कंपनीने २०१७ पासून दर वर्षी डिव्हीडंड जाहीर केला आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये कंपनीने ७:५ बोनसदेखील दिला. कंपनीच्या अर्निंग्ज पर शेअरमध्ये गेले तीन वर्षे वाढ होताना दिसत आहे.

कंपनीने आपले प्रॉडक्शन वाढवण्यासाठी गुंतवणूक (कॅपेक्स) केली आहे. याचे रिझल्ट्स लवकरच पहायला मिळतील. कंपनीच्या शेअरने नुकताच आपला ५२ वीक हाय नोंदवला आहे. त्यामुळे टेक्नीकलीसुद्धा स्टॉक अपट्रेन्डला आहे. हेल्दी ऑर्डरबुक, वाढत जाणारा प्रमोटर्स स्टेक, झिरो डेट या जमेच्या बाजू विचारात घेता हा शेअर येणाऱ्या काळात चांगला परतावा देऊ शकतो.

हा एक स्मॉल कॅप स्टॉक आहे. अशा कंपन्यांमध्ये गुंतवणुकीवर मिळाणारा रिटर्न चांगला असतो मात्र ही तेवढाच धोकाही असतो. त्यामुळे गुंतवणूक करताना विचार करून निर्णय घ्या.

Comments are closed.