दोन-तीन वर्षांसाठी पैसे लावायला स्टॉक शोधताय का? हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर
this stock can help you to create long-term wealth
वर्धमान स्पेशालिटी स्टील
मार्केट कॅप १००० कोटी
सध्याची किंमत – २७० रुपये
ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री लागणारे स्टील बार (हॉट रोल्ड बार्स, ब्राईट बार्स) बनवणारी भारतातील प्रमुख कंपनी
ग्राहक – टोयोटा, हिरो, मारुती, बजाज आणि ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमधील २०० हुन अधिक कंपन्या
टोयोटा ग्रुपची कंपनी आईची स्टीलचा वर्धमानमध्ये ११% स्टेक, त्यामुळे ग्लोबल मार्केटमधील संधी उपलब्ध होत आहे. पुढील २-३ वर्षांत एक्स्पोर्टचे प्रमाण सध्याच्या ५% वरून २५% वर नेण्याचा कंपनीचा मानस. सध्या थायलंड, तैवान, टर्की, रशिया, जर्मनी आणि स्पेन या देशांमध्ये ग्राहक.
नवीन कॅपेक्ससाठी अप्रूव्हल प्राप्त. यामुळे क्षमता ४०% ने वाढणार.
ऑपरेटिंग कॅश फ्लोमध्ये वाढ. २०२१ आर्थिक वर्षांत ९७ कोटी ऑपरेटिंग कॅश फ्लो जो २०२२ आर्थिक वर्षात आणखी वाढू शकतो. त्यामुळे एक्सपान्शन करण्यासाठी कंपनी स्वतःचे फंडिंग वापरू शकते.
प्रमोटर्सचा स्टेक ६०%. यापैकी ०% शेअर प्लेज
आईची स्टील आपला स्टेक वाढवण्याची शक्यता.
प्रामाणिक कंपनी व्यवस्थापन. एमडी सचित जैन हे आयआयटी आणि आयआयएमचे माजी विद्यार्थी.
जून २०२१ च्या तिमाहीत २८ कोटी नफा, ३३० कोटी महसूल. इयर ऑन इयर तुलना केल्यास जून २०२० मध्ये १३ कोटी तोटा आणि ६८ कोटी महसूल. सप्टेंबर २०२० पासून प्रत्येक तिमाहीला नफ्यामध्ये सातत्याने वाढ. अर्निंग्ज पर शेअरमध्ये गेल्या तीन क्वार्टरपासून सातत्याने वाढ.
सध्याचे नेट डेट १२० कोटींच्या आसपास. हे डेट लवकरच कमी करून डेट फ्री होण्यासाठी कंपनी प्रयत्नशील.
सातत्याने डिव्हीडंड देणारी कंपनी
येणाऱ्या काळात हा शेअर वेल्थ क्रिएटर ठरू शकतो.
टेक्निकल ॲनालिसिस
तुम्ही या कंपनीच्या मंथली चार्ट वर पाहू शकतात याने ऑल टाईम हाय चा टप्पा गाठताना ब्रेक आऊट दिला होता तसेच तो ब्रेक आऊट रिटेस्ट सुद्धा झाला आहे.
Comments are closed.