कापड क्षेत्रातून येतोय हा IPO…
The IPO is purely an offer for sale of 36,364,838 equity shares by promoter and existing shareholders
कापड क्षेत्रात नावाजलेली कोलकाता येथील हेवीवेट कंपनी, वेदांत फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेडने, IPO द्वारे फंड उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत.
एका रिपोर्ट मध्ये असे सूचित करण्यात आले होते की IPO सुमारे २,५०० कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे आणि त्यात मुख्यतः ओएफएस (ऑफर फॉर सेल) मुख्य घटक असेल जेणेकरून विद्यमान गुंतवणूकदाराना बाहेर पडणे सुलभ होईल.
रवी मोदींनी स्थापन केलेल्या आणि वेगाने वाढणाऱ्या कापड उद्योगातील ह्या कंपनीला भारतात खाजगी इक्विटी फर्म केदारा कॅपिटलचा पाठिंबा आहे. कंपनीच्या इतर ब्रँडमध्ये मोहे, मेबाज, त्वामेव आणि मंथन यांचा समावेश आहे. तर मान्यावर ब्रँड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.
फर्मच्या DRHP नुसार, इश्यूमध्ये विद्यमान प्रमोटर आणि स्टेकहोल्डरद्वारे ३६.३६ मिलियन शेअर्सची ऑफर (OFS) समाविष्ट आहे. राईन होल्डिंग्स लिमिटेडचे ओएफएसकडे १७.४६ मिलियन शेअर्स आहेत. केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड-केदारा कॅपिटल एआयएफद्वारे ७२३,००० शेअर्स आणि रवी मोदी फॅमिली ट्रस्टद्वारे १८.१८ मिलियन शेअर्स उपलब्ध आहेत.
सध्या, कंपनीत राइन होल्डिंग्जचा ७.२% हिस्सा आहे, तर केदारा एआयएफचा ०.३% हिस्सा आहे. रवी मोदी फॅमिली ट्रस्टचा फर्ममध्ये ७४.६७% हिस्सा आहे.
डीआरएचपीने म्हटले आहे की वेदांत फॅशन्स ऑफरमधून कोणतीही रक्कम प्राप्त करणार नाही. ऑफरचे उद्दीष्ट
(१) स्टॉक एक्सचेंजमध्ये इक्विटी शेअर्सची लिस्टिंग करण्याचे फायदे मिळवणे आणि
(२) ३६,३६४,८३८ पर्यंत इक्विटी शेअर्सची विक्रीशेअरहोल्डर्सद्वारे ऑफर करणे. फर्मला अपेक्षा आहे की इक्विटी शेअर्सची लिस्टिंग त्यांची विसिबिलिटी आणि ब्रँड इमेज वाढवेल.
आयपीओवर काम करण्यासाठी ॲक्सिस कॅपिटल, एडलवाईस फायनान्शिअल सर्व्हिसेस, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल या बँका आहेत. तर खेतान अँड कंपनी, सिरिल अमरचंद मंगलदास आणि सिंधू लॉ हे अनुक्रमे कंपनी, आय-बँक आणि शेअरहोल्डर चे कायदेशीर सल्लागार आहेत.
क्रिसिलच्या मते वेदान्त फॅशन्स ही आर्थिक वर्ष २०२० साठी महसूल, ओपीबीडीआयटी आणि नफ्याच्या दृष्टीने कापड व्यवसायात भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे.
३० जून २०२१ पर्यंत, कंपनी भारतातील २०७ शहरे, अमेरिका कॅनडा आणि युएई १२ EBOs मध्ये पसरलेल्या ५५ शॉप-इन-शॉपसह ५२५ एक्सक्लूसिव ब्रँड आउटलेट्स (EBOs) कव्हर करत आहे. कंपनीने १.१ मिलियन चौरस फूट क्षेत्र व्यापले आहे.
पुढील काही वर्षांमध्ये फर्मचे कार्यक्षेत्र दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे.
रवी मोदींची पत्नी शिल्पी मोदी ज्या प्रशिक्षित फॅशन डिझायनर फर्मच्या संचालक आहेत. २०२५ पर्यंत फर्मला मान्यवरसाठी १५,००,००० चौरस फूट जागा आणि मोहे साठी ५,००,००० चौरस फूट जागा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. १००० स्टोअर्स २५० फ्लॅगशिप आणि ५० ग्लोबल स्टोअर्स भारत आणि परदेशातील ३०० शहरांमध्ये उपलब्ध करण्याची कंपनीची योजना आहे. दरवर्षी १० मिलियन उत्पादन क्षमतेचेही कंपनीचे लक्ष्य आहे.
आर्थिक वर्ष २१ साठी फर्मची कमाई एक वर्षापूर्वी ९१५.५५ कोटींच्या तुलनेत ५६४.८२ कोटी रुपये होती. या कालावधीसाठी निव्वळ नफा मागील वर्षी ३११.८४ कोटी रुपयांच्या तुलनेत १८१.९२ कोटी रुपये होता.
फर्म डीआरएचपीमध्ये म्हणाले, “आम्ही आमच्या कंपनीच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहोत. यानुसार आम्ही आमच्या उत्पादनांची वाढती मागणी आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. क्लस्टर-आधारित विस्तार धोरणाद्वारे आम्ही आमचे पहिले ईबीओ स्थापित करण्याची योजना आखत आहोत.
वेदांत फॅशनचे लिस्टेड पीअर कोण असतील?
वेदांत फॅशन्सकडे काही लिस्टेड कंपन्यांमध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, टीसीएनएस कपडे, एसपी वीअरिंग, एसपी ॲपरल्स आणि व्हीआयपी क्लोथिंग यांचा समावेश आहे. योगायोगाने, फ्लिपकार्टची गुंतवणूकदार म्हणून ओळख असणाऱ्या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने अलीकडेच डिझायनर सब्यसची आणि तरुण ताहिलियानी यांच्याशी करार केला आहे.
फर्मचा क्रिकेट आणि बॉलिवूड या दोन्हीशी देखिल संबंध आहे. फर्म नेआयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांना प्रमोट केले आहे .अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणवीर सिंग सारख्या चित्रपट कलाकारांना त्यांच्या जाहिराती साठी उपलब्ध केले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या २०१७ मध्ये त्यांच्या हाय-प्रोफाइल लग्नापूर्वी केलेल्या जाहिरातीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.
Comments are closed.