थीमॅटिक फंड म्हणजे नक्की काय?

Thematic Funds make a theme based investment

सध्या बाजारात बरेच थीमॅटिक म्युच्यूअल फंड येत आहेत. नावावरून लक्षात येतं तसं हे फंड एक ठरविक थीम घेऊन वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. सेबीने या फंडांना घालून दिलेल्या नियमानुसार त्यांना आपल्या एकूण गुंतवणुकीच्या ८०% गुंतवणूक इक्विटीज किंवा त्याच्याशी निगडित इंस्ट्रुमेंट्समध्ये करावी लागते.

 

या फंडांचे सुद्धा प्रकार आहेत.

१. ग्लोबल थीमॅटिक फंड  –  हे फंड भारत आणि भारताबाहेरील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. मात्र हे करत असतानाही ते एक विशिष्ट थीम फॉलो करतात. जसे टेक्नॉलॉजी थीम असलेले फंड अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, टीसीएस सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

२. MNC थीमॅटिक फंड – नावावरून लक्षात येतं तसे हे फंड मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये पुन्हा टीसीएस, इन्फोसिस, टाटा मोटर्स, नेस्ले अशा कंपन्यांचा समावेश असू शकतो.

 

३. इतर थीमॅटिक फंड  – हे फंड फक्त भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. काही फंड डिजिटल इंडिया ही थीम समोर ठेवून तर काही रिन्यूएबल एनर्जी ही थीम समोर ठेवून गुंतवणूक करतात.

 

उदाहरणादाखल काही थीमॅटिक फंडांची नावे खालीलप्रमाणे

१. टाटा डिजिटल इंडिया फंड
२. कॅनरा रोबेको कन्झ्युमर ट्रेंड्स फंड
३. टाटा एथिकल फंड
४. निपॉन इंडिया यूएस इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड
५. निपॉन इंडिया जपान इक्विटी फंड

 

बऱ्याचदा इन्व्हेस्टर्स सेक्टर फंड आणि थीमॅटिक फंड यामध्ये गल्लत करतात. सेक्टर फंड हे समान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. थीमॅटिक फंड वेगवेगळ्या क्षेत्रातील एकच थीम असणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

या फंडांमध्ये गुंतवणूक करताना काय लक्षात ठेवाल?

१.  आधीच्या कामगिरीवर आधारित गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका. एकदा गुंतवणूक केल्यावर त्याचा फॉलोअप ठेवा.

२. या फंडामध्ये केलेली गुंतवणूक जशी चांगले रिटर्न्स देऊ शकते तेवढीच ती धोकादायक सुद्धा आहे.

३. गुंतवणूक करताना फंड नक्की कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतोय याचा नीट अभ्यास करा. त्या कंपन्यांचा परफॉर्मन्स कसा आहे जे जाणून घ्या मगच निर्णय घ्या.

Comments are closed.