ऑनलाइन पेमेंट केल्यास सोने स्वस्त, वाचा सविस्तर माहिती

Government has launched Sovereign Gold Bonds for FY 2021-22

भारत सरकारने २०२१-२२ या वर्षात पहिल्यांदा सोव्हेरिन गोल्ड बॉंड्स लाँच केले आहेत. येत्या सोमवार १७ मे पासून हे बॉंड्स गुंतवणुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. गुंतवणूकदार २१ मे पर्यंत गुंतवणूक करू शकणार आहेत.

 

विशेष म्हणजे या गुंतवणुकीसाठी जे गुंतवणूकदार ऑनलाइन अर्ज करून डिजिटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. हे पेमेंट स्मॉल फायनान्स आणि पेमेंट बॅंक्स वगळता अन्य सर्व बँकांमधून करता येणार आहे.

 

या बॉंड्सचा कालावधी ८ वर्षाचा असून त्याआधी विक्री करायची असेल तर ती पाचव्या वर्षांपासून करता येईल. एक गुंतवणूकदार किमान गुंतवणूक १ ग्रॅम युनिट आणि कमाल गुंतवणूक ४ किलो युनिटपर्यंत करू शकतो. या बॉंड्सवर सरकारकडून २.५% व्याजदेखील मिळणार आहे. ही रक्कम दर सहा महिन्यांनी गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केली जाईल. या व्याजावर कोणताही टीडीएस आकारला जात नाही. तसेच मुदतपुरतीनंतर मिळणाऱ्या लाभावरही कोणताही कर लागत नाही.

Comments are closed.