जर्मनी पाठोपाठ भारतही करेल का व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन धोरणांना रामराम? १५ मे रोजी येऊ घातलेल्या धोरणांवरून टीकांना वेग

व्हॉट्सअ‍ॅपचा गोपनीयता धोरणावरून सुरू झालेला त्रास संपलेला दिसत नाही. आता, जर्मनीच्या हॅम्बर्ग डेटा संरक्षण एजन्सीने फेसबुकला वर्षाच्या सुरूवातीला जाहीर करण्यात आलेल्या नवीन गोपनीयता धोरणानुसार व्हाट्सएपवरून संकलित केलेल्या कोणत्याही अतिरिक्त वापरकर्त्याच्या डेटावर प्रक्रिया करण्यास बंदी घातली आहे.

हे धोरण जाहीर झाल्यापासून जगभरातील वापरकर्त्यांद्वारे आणि देशांकडून याचा निषेध केला जात आहे कारण व्हॉट्सअ‍ॅप केवळ फेसबुकवर अतिरिक्त डेटा सामायिक करत नाही, तर वापरकर्त्यांना हे धोरण न स्वीकारण्याची मुभा देखील देत नाही. नवीन अटी व शर्ती १५ मे रोजी अंमलात आणल्या जातील आणि व्हॉट्सअॅपने आधीच इशारा देखील दिला आहे की जर वापरकर्त्यांनी ते न स्वीकारल्यास तुमचे अॅप निरुपयोगी बनेल (अघोषित कालावधीनंतर). दुसरीकडे फेसबुक आता या निर्देशाविरूद्ध अपील दाखल करण्याच्या पर्यायांकडे पहात आहे.

काय आहे भारतातील धोरणाची स्थिती?
नवीन धोरणाची अंमलबजावणी रोखण्यासाठी भारताने प्रयत्न केले होते, परंतु आता ही अंमलबजावणी पुढे ढकलण्यात आली आहे, किमान काही आठवड्यांपर्यंत या विषयावर काही काळ लक्ष घालण्याची गरज नाही.

आयटी मंत्रालयाने लवकरच धोरणाची दखल घेत व्हॉट्सअ‍ॅपला लिहिले होते की, भारतीय वापरकर्त्यांची निवड तसेच स्वायत्ततेबाबत हे धोरण गंभीर चिंतेची बाब आहे. मंत्रालयाने असेही प्रतिपादन केले की या नवीन धोरणामुळे मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या या कंपनीला वापरकर्त्यांमध्ये घट होण्याची शक्यता  नाकारता येत नाही. या व्यतिरिक्त, केंद्राने नवीन धोरणाविषयी आणि भारतात डेटा कसा संग्रहित केला जातो यासंबंधी व्हॉट्सअॅपला १४ प्रश्न पाठविले होते. नंतर, दिल्ली उच्च न्यायालयातही मंत्रालयाकडून असे सांगितले गेले की, नवीन गोपनीयता धोरण २०११ च्या आयटी नियमांचे ५ मुद्यांमद्धे उल्लंघन करीत आहे.

पण, भारतात टीका होत असल्याने, फेसबुकने आता केंद्रावर जोरदार हल्ला बोल केला आहे. फेसबुकचे असे म्हणणे आहे की बिगबास्केट, आरोग्य सेतू, झोमाटो आणि ओला सारख्या अ‍ॅप्स तसेच गूगल, झूम आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गज कंपन्या, नवीन धोरणांतर्गत फेसबुक संकलित करतं इतका किंवा त्याही पेक्षा जास्त डेटा संकलित करतात.

Comments are closed.