EV वाहनासाठी सरकार उभारतेय 22000 चार्जीग स्टेशन्स, मंत्र्यांनी दिली माहिती
देशभरातील 70,000 पेट्रोल पंपांपैकी 22,000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सरकारने शुक्रवारी राज्यसभेत दिली.
देशभरातील 70,000 पेट्रोल पंपांपैकी 22,000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सरकारने शुक्रवारी राज्यसभेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे म्हणाले की, एक्स्प्रेस हायवे, हायवे आणि जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी अशी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यास प्राधान्य दिले जाईल.
ते म्हणाले की, सरकारने फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ (हायब्रीड) इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया (FAME India)-II योजनेंतर्गत पुण्यातील ARAI या ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला फास्ट चार्जिंगसाठी प्रोटोटाइप विकसित करण्याचे आदेश दिले आहेत.
डिसेंबर 2022 पर्यंत ते बाजारात आणण्याचे उद्दिष्ट आहे, असे पांडे म्हणाले. या प्रकल्पावर काम सुरू असून पुढील वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत प्रोटोटाइप तयार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
“पेट्रोलियम आणि उर्जा मंत्रालयासह आमचे मंत्रालय FAME इंडियाच्या अंमलबजावणीसाठी संयुक्तपणे काम करत आहेत. आम्ही देशभरातील एकूण 70,000 पेट्रोल पंपांपैकी 22,000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या दिशेने काम करत आहोत आणि त्यासंदर्भात काम सुरू आहे,” ते म्हणाले.
“एक्स्प्रेस हायवे, हायवे आणि जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांवर चार्जिंग स्टेशन उभारण्याला आमचे प्राधान्य आहे आणि नंतर ते ग्रामीण भागात नेले जाईल. पण सध्या आमचे प्राधान्य या तीन क्षेत्रांवर आहे,” असेही ते म्हणाले.
भारताला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी देशात लिथियम बॅटरीचे उत्पादन करण्याचे काम सुरू आहे आणि 18,100 कोटी रुपयांची प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम (PLI) योजना विकसित करण्यात आली आहे, अशी माहितीही पांडे यांनी सभागृहाला दिली.
ते म्हणाले, “RFP तयार करण्यात आला आहे आणि उद्योगाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही भारताला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहोत
“मंत्रालयाने FAME इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्पा अंतर्गत 25 राज्ये/UTs मधील 68 शहरांमध्ये 2,877 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि नऊ एक्सप्रेसवे आणि 16 महामार्गांवर 1,576 चार्जिंग स्टेशन मंजूर केले आहेत,” पांडे म्हणाले.
उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक 25 किमी अंतरावर किमान एक चार्जिंग स्टेशन आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येक 100 किमी अंतरावर लांब पल्ल्याच्या आणि हेवी ड्युटी ईव्हीसाठी किमान एक चार्जिंग स्टेशन असणे आवश्यक आहे.शहरासाठी 3 किमी बाय 3 किमीच्या ग्रिडमध्ये किमान एक चार्जिंग स्टेशन उभारले जाईल, असेही ते म्हणाले.
Comments are closed.