योकोहामा करणार विस्तार, विझाग प्लांटमध्ये मोठी गुतंवणूक करण्याचा इरादा

Yokohama has announced an additional 171 million to investment into its upcoming vizag plant.

योकोहामा ह्या जपानी टायर कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमस्थित आपल्या ऑफ-हायवे टायर प्लांटमध्ये १७१ मिलियन डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे, जी नियोजित क्षमतेच्या जवळपास दुप्पट आहे .योकोहामा हायवे टायर्सचे सीईओ अनिल गुप्ता यांनी बुधवारी सांगितले की, प्रॉडक्शन कपॅसिटी आणि मनुष्यबळ यांचा विचार करता योकोहामाने भारतात केलेली (५०८ मिलीयन डॉलर्सची) गुंतवणूक ही त्यांच्या जगभरातील इतर कोणत्याचीच गुंतवणुकीपेक्षा मोठी आहे.

याअगोदर कंपनी विशाखापट्टणम प्लांटमध्ये दिवसाला १३७ टन एवढ्या प्रॉडक्शन कपॅसिटीसाठी १६५ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार होती. मात्र आता यामध्ये वाढ करत प्रॉडक्शन कपॅसिटी आणखी १२० टनाने वाढवण्याचे कंपनीचे नियोजन आहे. आणि त्यासाठी १७१ मिलियन डॉलर्स अधिक गुंतविण्याची त्यांची तयारी आहे. यामुळे एकूण प्रॉडक्शन कपॅसिटी प्रतिदिन २५७ टन होईल.

कंपनी करत असलेल्या ५०८ मिलियन डॉलर्सच्या गुंतवणूकीपैकी ३३६मिलियन डॉलर्स विझाग प्लांटसाठी वापरले जाणार आहेत. उरलेली रक्कम कंपनीने अलायन्झ टायर ग्रुपकडून विकत घेतलेल्या दहेज आणि तिरुनेलवेल्ली प्लांट्समध्ये गुंतवली जाणार आहे.

योकोहामाने २०२० च्या सुरुवातीला १६५ मिलियन डॉलर्सच्या गुंतवणूकीसह विझाग प्लांटची घोषणा केली होती. अलायन्स, गॅलेक्सी, प्रायमेक्स आणि आयची या ब्रँड अंतर्गत कंपनी आपली उत्पादने जागतिक पातळीवर विकते. भारतात,योकोहामा ऑफ हायवे टायर्स इंडिया आणि योकोहामा इंडिया हे दोन युनिट टायर तयार करतात.

१६५ मिलियन डॉलर्सच्या गुंतवणूकीचा पहिला टप्पा २०२३ मधे, तर उर्वरित दुसऱ्या टप्पा २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सुरू होणार आहे.दहेज आणि तिरुनेलवेली प्लँट मधे (अलायन्स, गॅलेक्सी आणि प्रायमेक्स) चे उत्पादन केले जाते,यातील 90% पेक्षा जास्त उत्पादन हे परदेशात पाठवले जाते, दहेज प्लांटची प्रति दिन क्षमता १,२६,००० टायर आहे, तर तिरुनेलवेली प्लांटची क्षमता ८६,८०० टायर एवढी आहे.

Comments are closed.