ड्रीम स्पोर्ट्स करतेय स्टार्टअप्समध्ये 250 मिलीयन डॉलरची गुंतवणूक

Dream sports plans to invest 250 million in gaming and fitness startups

ड्रीम स्पोर्ट्स या नामांकित गेमिंग कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गेमिंग, फिटनेस अश्या स्टार्टअप मध्ये २५० मिलीयन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

ड्रीम कॅपिटलने १०० मिलीयन डॉलर पर्यंतची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. टीपीजी आधारित युनिकॉर्न आपला नफा नवीन उपक्रमांमध्ये गुंतवेल. यासाठी ड्रीम स्पोर्ट्स बॅलन्स शीट द्वारे निधी पुरवठा केला जाईल. यामुळे कंपनी अशा स्टार्टअप्सच्या शोधात आहे, ज्यात पाच वर्षात १०० मिलियन डॉलर्सची कमाई होऊ शकते.

ड्रीम स्पोर्ट्सचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष जैन म्हणाले.”सध्या ड्रीम स्पोर्ट्सला 125 मिलियन वापरकर्ते आहेत.भारतात गेमिंग आणि फिटनेस-टेकमध्ये उत्तम संधी उपलब्ध असून, आम्ही ड्रीम कॅपिटलच्या माध्यमातून इतर उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी CXOs द्वारे मदत करणार आहोत”.

आतापर्यंत कंपनीने आठ ठिकाणी गुंतवणूक केली आहे ज्यात ड्रीमगेमस्टुडिओस, मोबाइल गेमिंग स्टुडिओ, सोस्ट्रॉनक इ.समावेश आहे. इस्पोर्ट्स प्लॅटफॉर्मवर देखील स्पोर्ट्स फुटवेअर आणि इक्विपमेंट ब्रँड उपलब्ध केले आहेत, तसेच फॅनकोड मधेही मोठी गुंतवणूक केली आहे.

ड्रीम कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक देव बजाज म्हणाले की, मल्टी-स्टेज सीव्हीसी म्हणून, आम्ही स्टार्टअप्सना पूर्णपणे मदत करणार आहोत.आमचा मुख्य उद्देश हा उद्योजकांना आमचे धोरण, उत्पादन आणि मार्केटिंग बद्दल ओळख निर्माण करून असा आहे.

Comments are closed.