वाहत्या गंगेत सगळेच हात धुतात – येतोय आणखी एक आयपीओ

Tarsons products limited has filed preliminary papers with Sebi to raise funds through an IPO.

नामांकित लाइफ सायन्स कंपनी टार्सन्स प्रॉडक्ट्स लिमिटेडने सेबीकडे आयपीओद्वारे फंड उभारण्यासाठी अधिकृत कागदपत्रे दाखल केली आहेत. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार,शेअर विक्रीमध्ये प्रमोटर्सद्वारे 150 करोड़ किमतीचे 1.32 करोड़ इक्विटी शेअर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

OFS चा एक भाग म्हणून,संजीव सेहगल 3.9 लाख इक्विटी शेअर, रोहन सेहगल 3.1 लाख इक्विटी शेअर्सची विक्री करतील. याबरोबरच क्लियर व्हिजन इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड 1.25 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री करेल.

कंपनीकडून प्री-आयपीओ प्लेसमेंट 30 कोटीपर्यंत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जर ही प्लेसमेंट पूर्ण झाली तर फ्रेश इश्यू साईज कमी होईल.

फ्रेश इश्यूद्वारे मिळणारी रक्कम ही डेट कमी करणे,पश्चिम बंगालमधील पंचला येथे नवीन प्रॉडक्शन फॅसिलिटी उभारणे आणि इतर कामांसाठी वापरली जाईल.

टार्सन्स कंपनी ही विविध संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था, फार्मास्युटिकल फर्म, डायग्नोस्टिक्स कंपन्या तसेच रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘लॅबवेअर’ चे उत्पादन करते. ही लॅबवेअर उत्पादने, वैज्ञानिक शोध आणि आरोग्यसेवा सुधारण्यास मदत करतात.

सध्या कंपनी पश्चिम बंगालमध्ये असलेल्या पाच उत्पादन केंद्रात कार्यरत आहे.

Comments are closed.