भर करोनाच्या साथीत घेतलाय १०० कोटींचा बंगला, तेही साऊथ दिल्लीत
Bunglow deal worth 100 Crore in the middle of Covid pandemic
साऊथ दिल्लीमधील पॉश एरिया समजल्या जाणाऱ्या वसंत विहारमध्ये भर करोनाच्या साथीत एका बंगल्याची १०० कोटींना विक्री झाली आहे. मनीकंट्रोल वेबसाईटने याबाबत वृत्त दिले असून २००० स्क्वेअर फुटांचा हा बंगला असल्याचे समजते.
आकाश एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे जे सी चौधरी यांनी हा बंगला विकत घेतला असून आदित्य टेक्नो बिल्ड प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्याची विक्री केली आहे. या बंगल्याचे रजिस्ट्रेशन ६ एप्रिल २०२१ रोजी झाले आहे.
नेमके याच आठवड्यात आकाश इन्स्टिट्यूटला बायजूज या आघाडीच्या एज्युकेशनल स्टार्टअप ने विकत घेतले होते. हे डील जवळपास ७०००-७५०० कोटींचे होते. आकाश इन्स्टिट्यूटच्या भारतात जवळपास २०० शाखा आहेत. मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असे हजारो विद्यार्थी आकाश इन्स्टिट्यूटच्या वर्गात प्रवेश घेत असतात.
स्थानिक एजंटने दिलेल्या माहितीनुसार वसंत विहारमधील या भागात असे फक्त २५ मोठे प्लॉट आहेत. बाकी सगळे प्लॉट ४०० ते १०० स्क्वेअर यार्डाचे आहेत. या डीलसाठी एकूण ७ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली. गेल्या काही महिन्यांत दिल्लीतील वसंत विहार, वेस्ट एन्ड, शांती निकेतन, सुंदर नगर अशा भागांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांच्या मालकांनी घरे विकत घेतली आहेत.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये रिलॅक्सो फुटवेअरच्या रितेश दुआ यांनी वसंत विहारमध्ये १२५० स्क्वेअर फुटांचा बंगला ७० कोटींना खरेदी केला. तसेच डिक्सन टेक्नॉलॉजीचे सुनील वाच्छानी यांनी गोल्फ लिंक येथे १२५० स्क्वेअर फुटांचा बंगला १७०० कोटींना विकत घेतला होता.
Comments are closed.