टाटा आणि एअरबस करणार लष्करासाठी एअरक्राफ्ट, झाला ऐतिहासिक करार

Under the deal, 16 aircraft will be delivered in a flyaway condition by Airbus Defence and Space within 48 months of signing the contract.

टाटा आणि एअरबसने हवाई दलाकरीता एकूण 56 C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट निर्मितीसाठी 22,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. ही आजपर्यंतची खाजगी प्रोडक्शनला मिळालेली सर्वात मोठी लष्करी ऑर्डर आहे.

टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “C -295 तयार करण्यासाठी एअरबस डिफेन्स आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टिम्स यांच्यातील जॉइंट प्रोजेक्टला परवानगी हे भारतात मोठे प्रोजेक्ट निर्मितीसाठी एक महत्वाचे पाऊल आहे.”

करारानुसार, 56 पैकी 40 विमाने भारतात एअरबस डिफेन्स अँड स्पेस आणि टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (टीएएसएल) च्या कन्सोर्टियमद्वारे 10 वर्षांच्या आत तयार केली जातील.

करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 48 महिन्यांच्या आत एअरबस डिफेन्स अँड स्पेसद्वारे 16 विमाने फ्लायवे कंडीशनमध्ये वितरित केली जातील. C -295 मेगावॅट विमान हे 5-10 टन क्षमतेचे ट्रान्सपोर्ट विमान आहे.

टाटा पुढे म्हणाले की, C -295 हे मल्टीरोल विमान आहे. तसेच आम्ही योग्य प्रमाणात विमाने लवकर उपलब्ध करु.

भारतात हा पहिलाच प्रकल्प आहे ज्यामध्ये एका खासगी कंपनीद्वारे भारतात लष्करी विमानांची निर्मिती केली जाईल. एरोस्ट्रक्चरचे कंपोनेंट, असेंब्ली भारतात उत्पादित केली जाणार आहे.

नवीन C -295MW हे एव्रो एअरक्राफ्ट ची जागा घेईल. एव्रो रिप्लेसमेंट प्रोग्रामला सुमारे नऊ वर्षांपूर्वी मान्यता देण्यात आली होती.

संरक्षण मंत्रालयाने म्हटले होते की डिलिव्हरी होण्यापूर्वी, C -295 MW एअरक्राफ्टसाठी सर्व्हिसिंग सुविधा भारतात उभारली जाणार आहे.

ही सर्व्हिस C-295 विमानांच्या विविध प्रकारांसाठी रिजनल एमआरओ हब म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे.

Comments are closed.