ऑगस्ट प्रमाणेच सप्टेंबरमध्ये ही वाहणार “गुंतवणुकीचे वारे”!
Nine companies are seeking to collectively accumulate about Rs 12,500 crore in September.
सध्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहे, आणि अनेक कंपन्यांनी देखील मार्केट मध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. भविष्यात देखिल अजून गुंतवणूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यासह नऊ कंपन्या सप्टेंबरमध्ये सुमारे १२,५०० कोटी रुपये गुंतवण्याचा करीत आहेत, यामुळे गुंतवणुकीचा आलेख वाढत जाण्याची शक्यता आहे.
विजया डायग्नोस्टिक्स,ॲमी ऑरगॅनिक्स, सान्सेरा इंजिनिअरिंग, आरोहन फायनान्शिअल, पेन्ना सिमेंट, श्री बजरंग पॉवर आणि पारस डिफेन्स यांनी प्रायमरी शेअर विक्रीची तयारी केली आहे, रुची सोयाची ४,५०० कोटी रुपयांची फॉलो-ऑन ऑफर देखील सप्टेंबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे.
सोमवारी निफ्टी सुमारे १७,००० वर गेला ज्यामुळे टोकियो ते टोरोंटोमधील स्टॉक ला याचा फायदा झाला.
ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात, आठ कंपन्यांनी १८,२४४ कोटी रुपये IPO साठी मार्केट मध्ये जमा केले नोव्हेंबर २०१७ पासून हा आकडा सर्वात मोठा होता.आणि गुंतवणुकदारांकडून प्रतिसाद पण चांगला मिळत आहे.
पण हेही लक्षात घेतला पाहिजे ऑगस्टमध्ये उपलब्ध झालेल्या १२ पैकी ७ आयपीओ हे सध्या त्यांच्या ऑफर किमतींच्या खाली व्यापार करत आहेत.
विजया डायग्नोस्टिक सेंटर आणि ॲमी ऑर्गेनिक्स १ सप्टेंबरला अनुक्रमे १८९५ कोटी आणि ५७० कोटी रुपये उभारण्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध होतील. विजया डायग्नोस्टिक सेंटरची ऑफर ५२२ ते ५३१ रुपये प्रति इक्विटी शेअर अशी आहे.
ॲमी ऑर्गेनिकच्या ऑफरमध्ये २०० कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि २० स्टेकहोल्डरद्वारे ६ मिलियन इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर आहे. ॲमी ऑरगॅनिक्स रसायने तयार करते जी फार्मास्युटिकल इंटरमीडिएट्सच्या विकास आणि निर्मितीमध्ये वापरली जातात. कंपनीने ऑफरसाठी किंमत बँड प्रति इक्विटी शेअर ६०३-६१० रुपये निश्चित केली आहे.
आदित्य बिर्ला सन लाइफ ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा म्युच्युअल फंड आहे, जो २.७५ लाख कोटी रुपयांच्या मालमत्ता असलेल्या शेअर विक्रीमध्ये सुमारे ३,००० कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे आणि कंपनीचे एकूण मूल्य २४,००० कोटी रुपये आहे.
आरोहन फायनान्शियल सर्व्हिसेस आणि हैदराबादची पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीज देखील सप्टेंबरमध्ये प्रायमरी मार्केट मध्ये उतरू पाहत आहेत. आरोहन फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या ऑफरमध्ये ८५० कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि विद्यमान स्टेकहोल्डरकडून २७.१ मिलियन इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर समाविष्ट आहे.
पेना सिमेंटला जूनच्या पहिल्या आठवड्यात आयपीओसाठी सेबीकडून मंजुरी मिळाली, यात १,३०० कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि कंपनीचे प्रवर्तक पीआर सिमेंटकडून २५० कोटी रुपयांपर्यंतच्या विक्रीची ऑफर असेल.
ऑटो चे साहित्य बनवणाऱ्या संसेरा इंजिनीअरिंगची १,४०० कोटी रुपयांची ऑफर ज्याला सेबीने गेल्या महिन्यात IPO साठी परवानगी दिली, ती पूर्णपणे प्रवर्तक आणि विद्यमान स्टेकहोल्डरद्वारे १७ मिलियन इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी उपलब्ध असेल.
रुची सोया इंडस्ट्रीज किमान शेअरहोल्डिंग निकष पूर्ण करण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी ४,३०० कोटी रुपयांचे भागभांडवल विकण्याची आपली फॉलो-ऑन ऑफर सुरू करण्याची योजना आखत आहे. सेबीच्या नियमानुसार, पतंजलीने कंपनीतील आपले होल्डिंग १८ महिन्यांच्या आत ९०% आणि तीन वर्षांत ७५% पर्यंत खाली आणले पाहिजे.
Comments are closed.