युनिफार्मच्या वतीने पुण्यात ग्लोबल वेब ३ टॉक सिरीजच्या दुसऱ्या सत्राला उस्फुर्त प्रतिसाद   

क्रिप्टो करन्सीबद्दलच्या मिथकांचा पर्दाफाश करीत दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य साधनांसह सक्षम करण्यासाठी युनिफार्मच्या  वतीने ग्लोबल वेब ३ टॉक सिरीजच्या दुसऱ्या सत्राचे आयोजन येरवडामधील ९१ स्प्रिंगबोर्ड या को-वर्किग स्पेसमध्ये करण्यात आले  होते.
या सत्रात नामांकित उद्यम भांडवलदार, मार्केटिंग गुरू, क्रिप्टोबाबत उत्साही असे गुंतवणूकदार आणि इतर अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते . युनिफार्मच्या संस्थापक तरुषा मित्तल आणि मोहित मदन शहरातील गुंतवणूकदार समुदायाशी संवाद साधला . या पुर्वी दिल्लीमध्ये आयोजित या सत्रास मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. तेथील यशानंतर देशातील सर्वात मोठा क्रिप्टो हॉट स्पॉट्सपैकी एक असलेल्या पुण्यात या चर्चासत्राचा दुसरा अध्याय आयोजित केला होता . पुण्यातील गुंतवणूकदारांना वेब ३ च्या पूर्ण क्षमतेचा फायदा उठवण्यासाठी प्रबोधन करणे हे या चर्चा मालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुण्यातील  पहिल्या चर्चासत्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. त्यासाठी ३५० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. त्यातील १२० पेक्षा जास्त गुंतवणूकदार होते. त्यांनी निष्क्रिय उत्पन्न निर्माण करण्याच्या ७ चॅनेलमध्ये सक्रियपणे सहभाग घेतला. या चर्चसत्रात विविध कागदपत्रे देखील सादर करण्यात आली. 
 
सत्रात सहभागी झालेल्यांना क्रिप्टो विश्वाचा शोध घेण्यास सक्षम करणे. त्याच्याशी निगडित मिथकांना उलगडणे. स्टॅकिंग, एलपी स्टॅकिंग, लेंडिंग, लर्निंग टू अर्न, वॉक अशा विविध मार्गांचा वापर करून क्रिप्टो मालमत्ता गुंतवून निष्क्रीय उत्पन्न कसे मिळवायचे याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच क्रिप्टोमधून येणारे उत्पन्न यिल्ड नोड्स, मर्ज मायनिंग, एअरड्रॉप्स याविषयी देखील माहिती दिली जार्इल. हे सत्र क्रिप्टोबाबत माहिती करून घेत क्रिप्टोकरन्सी क्षेत्राबद्दल उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी त्यांच्या माहितीत भर घालणारा ठरणार आहे. सत्रात सहभागी होताना एकमेकांशी संवाद साधण्याची आणि नेटवर्कींग करण्याची संधी देखील मिळेल.
जागतिक वेब ३ टॉक सिरीज ही युनिफार्मच्या जागतिक प्रसार कार्यक्रमाचा एक भाग आहे. ज्यामुळे स्टॅकिंग आणि क्रिप्टो गुंतवणुकीच्या इतर मार्गांवरून निष्क्रीय उत्पन्न निर्माण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करेल. सध्या देशातील क्रिप्टो बाजारपेठ विविध सुधारणांच्या टप्प्यातून जात आहे. गुंतवणूकदारांना त्यांचा क्रिप्टो पोर्टफोलिओ एका विशिष्ठ टप्प्यात ठेवण्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.  त्यामुळे गुंतवणूकदारांना क्रिप्टो मालमत्तेची खरी क्षमता वापरण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य देणे हे युनिफार्मचे उद्दिष्ट आहे.

Comments are closed.