अरे बापरे!आधीच IPO चा पाऊस आणि आता डायरेक्ट 1 बिलियन डॉलर ची हौस, येतोय हा IPO
Fabindia, a retailer of artisan products and lifestyle items, is considering raising up to $1 billion through an IPO
फॅबइंडिया(अर्टिसन प्रॉडक्ट आणि लाईफस्टाईल आयटेम विक्रेता) आयपीओद्वारे १ अब्ज डॉलर्स उभारण्याचा विचार करत आहे. कंपनीने सांगितले की, ते वेळोवेळी भांडवला संबंधित विविध पर्यायांचा विचार करत आहेत. बँकर्सकडून देखिल याबाबत सल्ले घेतले जात आहेत.
कंपनी आयपीओ मॅनेज करण्यासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट्स, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि जेपी मॉर्गनसह अनेक गुंतवणूक बँकांशी बोलणी करत आहे.
फॅबइंडिया नोव्हेंबरच्या अखेरीस सेबीकडे आयपीओची ड्राफ्ट डॉक्युमेंट्स सादर करेल अशी अपेक्षा आहे.
कंपनीने २ अब्ज डॉलर्सचे व्हॅल्यूएशन करणे अपेक्षित आहे आणि आयपीओद्वारे सुमारे २५-३० टक्के स्टेकविक्री करणे अपेक्षित आहे. त्यांचे विद्यमान स्टेकहोल्डर (जसे की अझीम प्रेमजीचा खासगी इक्विटी फंड प्रेमजीइन्वेस्ट) कंपनीमध्ये स्टेक विकू शकतात.
इन्फोसिसचे को-फाऊंडर नंदन निलकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी निलकणी हेही कंपनीचे स्टेकहोल्डर आहेत. फॅबइंडिया समूहाच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “कंपनी वेळोवेळी भांडवलाशी संबंधित विविध पर्यायांचा विचार करते आहे. आम्ही आमच्या बँकर्सचा सल्लाही घेत आहोत. योग्य वेळी आम्ही संचालक मंडळाशी चर्चा करु आणि निर्णय घेऊ.
१९६० मध्ये सुरु झालेल्या फॅबइंडिया कंपनीने भारतातील ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध केले आहेत.आणि ते टिकवून ठेवण्यास मदत करणाऱ्या गावांमधून कंपनी आपली उत्पादने घेते.
Comments are closed.