पिक्सल 5A मध्ये 6GB + 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशन आहे. याची अमेरिकेतील किंमत 449 डॉलर (अंदाजे 33,400 रुपये) आहे. फोन फक्त सेट ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. पिक्सल 4A ला पॉलिकार्बोनेट बॉडी होती. मात्र या फोनला गुगलने मेटल बॉडी दिली आहे.
या फोनला 6.34-इंच चा HD+ OLED डिस्प्ले आहे ज्यामध्ये होल-पंच कटआउट आहे. स्क्रीनवर 700 nits ची पीक ब्राइटनेस आहे. परंतु, डिव्हाइसमध्ये हाई रिफ्रेश रेट सपोर्ट नसल्याने त्यात फक्त 60Hz रिफ्रेश रेट पॅनल येतो. वॉटर आणि डस्ट रेसिस्टंस् साठी IP67 रेटिंग उपलब्ध आहे. तसेच हेडफोन जॅक आणि फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील आहे.
परफॉर्मन्सच्या बाबतीत, पिक्सल 5A मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी एसओसी प्रोसेसर आहे. याबरोबरच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसुद्धा आहे. फोनमध्ये 4,680 एमएएच बॅटरी 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुविधा आहेत.
गुगल फोनच्या मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे.यामध्ये 12.2 एमपी प्रायमरी कॅमेरा आणि 177-डिग्री फील्ड व्ह्यूसह 16 एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेरामध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी 8 एमपी सेन्सर आहे.
गुगल पिक्सल 5A ला अँड्रॉइड 11 ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. येत्या काही आठवड्यांत अँड्रॉइड 12 देखील उपलब्ध करून दिले जाईल. डिव्हाइस वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, जीपीएस इत्यादींना देखील सपोर्ट करते आणि याचे वजन 183 ग्रॅम आहे.
वर नमूद केल्याप्रमाणे, पिक्सल 5A फक्त यूएस आणि जपान मध्ये लॉन्च झाला आहे. त्यामुळे या फोनच्या भारतातील चाहत्यांना पिक्सल हातात येण्यासाठी सध्यातरी वाट पहावी लागणार आहे.
Comments are closed.