ऐकलं का! ‘या’ कंपनीत चांगलं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार मर्सडीज बेंझ
आयटी कंपन्यांध्ये हुशार कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन दिर्घकाळ काम करणे हे नेहमीच कठीण समजले जाते. कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कंपनी सोडणाऱ्यांची संख्या हे गणित जुळणे कठीण होत असल्यामुळे मोठ्या नामवंत कंपन्यांना आपले प्रतिभावान कर्मचारी कसे टिकवायचे हे जोखमीचेच होऊन बसले आहे. याच कारणास्तव एचसीएल टेक (HCL Tech)ने एक नवीन मोहीम चालू केली आहे. या योजनेअंतर्गत सगळ्यात चांगली कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी तर्फे मर्सिडीज बेंज भेट म्हणून दिली जाणार आहे.
कंपनीचे मुख्य एच आर असणाऱ्या अप्पाराव वीवी यांनी सांगितले आहे की, ‘मर्सिडीज बेंज देऊ करण्याचा प्रस्ताव व्यवस्थापनाकडे पाठवण्यात आलेला असून त्यांच्याकडून होकार आल्यास यावर अंमलबजावणी सुरु होईल.’
याआधी सुद्धा एचसीएल टेकने आपल्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे प्रोत्साहित करण्यासाठी बऱ्याच गोष्टींचा वापर केलेला आहे. यामुळे एचसीएल टेकबद्दलचा विश्वास कायमच कर्मचाऱ्यांना नेहमीच वाटतो. एचसीएल टेकने २०१३ मध्ये उत्तम काम करणाऱ्या ५० जणांना “मर्सिडीज बेंज” भेट म्हणून देऊन सन्मानित केले होते. काही कारणांमुळे जरी या योजनेमध्ये खंड पडला असला तरीही कंपनीने पुन्हा ही योजना राबवण्याचे काम हाती घेतले आहे.
आप्पारावांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला जेव्हा कर्मचारी सोडून जातात व नविन कर्मचारी घ्यावे लागतात तेव्हा जवळपास १५ ते २०% रक्कम मोजावी लागते. म्हणूनच संस्थेला नफा मिळवून देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यावर आणि प्रतिभासंपन्न कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या वाटेने कंपनी न सोडून जाण्याबद्दल अशा मार्गाने तयार केले जाते.
काही जागा नवीन कर्मचाऱ्यांनी भरायच्या असल्यास त्या जुन्या रोजगारामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतात पण नवीन विशेष प्राविण्याची गरज असणाऱ्या जागांसाठी मात्र संस्थेला अधिक रक्कम मोजावीच लागते, असेही ते म्हणाले.
२०२२ मध्ये कंपनी २० ते २५ हजार नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे असे अंदाज बांधले जात आहेत. नवीन कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून पगारवाढ करण्यावर सुद्धा संस्थेचा या काळात भर असेल.
Comments are closed.