मला बिटकॉइनमधलं काही समजत नाही – स्टार्टअप मालकाचे मोठे वक्तव्य 

One should not allocate more than 1-2% of their portfolio to Crypto Currency

गेले दोन तीन दिवस बिटकॉइन या क्रिप्टोकरंसीमध्ये बरीच पडझड झाली. अनेक गुंतवणूकदारांचे यात नुकसानही झाले. ज्या वेगाने बिटकॉइन वर गेला त्याच वेगाने तो खालीही आला. याच परिणाम इतर क्रिप्टोकरंसीवरही दिसून आला. या पार्श्वभूमीवर भारतातील आघाडीची ब्रोकर कंपनी झिरोधाचे मालक नितीन कामत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

“मला बिटकॉइनमधील काही समजत नाही.त्यामुळे मी त्यात गुंतवणूकही करत नाही. सध्या बिटकॉइन विकत घेण्यामागे एकच कारण आहे. ते म्हणजे इतर कुणीतरी तुमच्यकडून ते जास्त किंमत देऊन खरेदी करेल ही आशा.बिटकॉइन अचानक एवढा वर का गेला हे मला समजत नाही. त्यामुळे त्यात अचानक पडझड का झाली हेही मी सांगू शकत नाही. कदाचित यामागे चीन हे एक कारण असू शकेल. ज्या पद्धतीने एलन मस्क यांनी बिटकॉइनबद्दल वक्तव्य केले त्यावरून असे वाटते की त्यांना चीनमध्ये पडद्यामागे काय घडते आहे याची कल्पना आहे. त्यांचे वक्तव्य अचानक केलेले नक्कीच नव्हते.” असे कामत म्हणाले.

गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओमधील १-२% पेक्षा जास्त गुंतवणूक क्रिप्टोकरंसीमध्ये करू नये असे मत कामत यांनी मांडले. झिरोधा क्रिप्टोकरंसीमधील गुंतवणुकीची संधी आपल्या ग्राहकांना कधी उपलब्ध करून देणार? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, “जर सरकारने परवानगी दिली तरच आम्ही हा पर्याय उपलब्ध करून देऊ.” अर्थात हे कधी होईल याचे उत्तर सध्यातरी कुणाकडे नाही.

Comments are closed.