व्हाट्सअपची नमती भूमिका, अजून अकाऊंट्स आहेत सेफ 

WhatsApp is hopeful that users in India will accept it's new privacy policy

व्हाट्सअपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी कंपनीने १५ मे ची मुदत दिली होती. मात्र आता १५ मे उलटून गेल्यानंतरही कंपनीने कोणतेही अकाऊंट डिलीट केलेले नाहीत. कंपनी आपल्या युजर्सने नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यासाठी आठवण देत राहील असे त्यांनी स्पष्ट केले.

भारतातील बऱ्याच युजर्सने व्हाट्सअपची नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली आहे असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीकडून कंपनीला पत्र पाठवण्यात आले आहे. व्हाट्सअपने एक तर आपली प्रायव्हसी पॉलिसी मागे घ्यावी किंवा त्यात बदल करावेत असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राला उत्तर देण्यासाठी सरकारकडून व्हाट्सअपला २५ मे २०२१ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

व्हाट्सअप मात्र अजूनही आपली नवी पॉलिसी कोणत्याही युजर्सच्या प्रायव्हेट मेसेजवर परिणाम करत नाही अशी भूमिका घेत आहे. अजूनही बऱ्याच युजर्सने ही पॉलिसी स्वीकारली नसली तरी त्यांना त्यासाठी वेळ लागू शकतो हे आम्ही समजू शकतो असे कंपनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात सरकारच्या पत्राला व्हाट्सअपकडून काय उत्तर दिले जाते हे लवकरच समोर येईल.

Comments are closed.