तुमची जबरदस्ती चालू देणार नाही – फोन पेने घेतली थेट गुगलबरोबर टक्कर 

PhonePe plans to expand its own super app in opposition to Google's new Play Store rules

युपीआय पेमेंट्सची भारतातील आघाडीची कंपनी फोनपे इंडस ओएस ही कंपनी विकत घेणार आहे. यासाठी फोनपे तब्बल ६० मिलियन डॉलर्स मोजणार असल्याचे वृत्त आहे. गुगलने विविध ऍप्ससाठी लागू केलेल्या नियमाच्या विरोधात फोनपेने हा निर्णय घेतल्याचे समजते.

विविध कंपन्यांकडून आपले प्ले स्टोर वर आपले ऍप्स ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. हे ऍप्स वापरताना काही पेमेंट करण्याची वेळ आली तर ही पेमेंट्स वेगळ्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून राऊट केली जातात. हे थांबविण्यासाठी गुगलने विविध ऍप्स कंपन्यांकडून प्ले स्टोर वापरण्यासाठी १५-३० टक्के रक्कम आकारणार असल्याचे जाहीर केले आहे. नेमका याच गोष्टीला ऍप कंपन्यांचा विरोध आहे. आम्ही गुगलवर जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असताना गुगलला आणखी पैसे देण्याची काय गरज आहे?असा सवाल या कंपन्यांनी उठवला आहे.

सध्या इन ऍप परचेससाठी भारतीय कंपन्यांना गुगलला पैसे द्यावे लागत नाहीत. मात्र मार्च २०२२ पासून कंपन्यांना यासाठी गुगलला पैसे द्यावे लागतील. यालाच पर्याय म्हणून फोनपेने इंडस ओएस विकत घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. फोनपे च्या स्विच या प्लॅटफॉर्ममध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी इंडस ओएसचा कंपनीला फायदा होईल. स्विच या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ओला, रेडबस, मिंत्रा, ग्रोफर्स सारखी ऍप्स एकाच जागी वापरू शकता. शिवाय ही ऍप्स तुम्हाला डाउनलोड करण्याचीसुद्धा गरज नाही.

इंडस ओएस ही कंपनी आकाश डोंगरे, राकेश देशमुख आणि सुधीर भांगरामबंदी यांनी सुरु केली असून त्यांना आत्तापर्यंत २० मिलियन डॉलर्सचे फंडिंग मिळाले आहे.

Comments are closed.