लॉकडाऊनमध्ये घर बसल्या कमवा ५० हजार रुपये, मोदी सरकराने दिलीय खास संधी

भारतात सध्या अनेक राज्यात कोरोनामुळे स्थिती गंभीर झाली आहे. याच कारणामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनही लावले आहे. यामुळे काही लोकांच्या नोकऱ्या यापुर्वीच गेल्या आहे तर काहींना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. अशातच केंद्र सरकारने घरबसल्या ५० हजार रुपये कमविण्याची संधी दिली आहे.

जर तुम्ही डिझाईनिंग करत असाल तर तुम्हाला तुमच्या पसंतीचे कामही करता येणार आहे व त्यापासून पैसेही मिळणार आहेत. केंद्र सरकारकडून एक प्रतियोगिता जाहीर करण्यात आली आहे. या प्रतियोगीतेद्वारा तुम्हाला ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळविण्याची मोठी संधी आहे तीदेखील घरबसल्या.

केंद्र सरकराने वन नेशन वन राशन कार्ड या उपक्रमाचा लोगो बनविण्याची प्रतियोगीता आयोजीत केली आहे. देशात अनेक लोक हे ग्राफिक्स डिझाईनिंग व लोगो डिझाईनिंग करतात. या लोकांसाठी ही मोठी संधी आहे.

My Gov India या अकाऊंटवरुन एक ट्विट करण्यात आला आहे. ‘तुम्हाला या प्रतियोगीतेत भाग घ्यायचा असेल तर खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सुरु केलेल्या डिझाईन प्रतियोगितेचा तुम्हाला भाग बनावे लागेल. यासाठी तुम्ही ३१ मे २०२१ पर्यंत नावनोंदणी करु शकता. यात जिंकणाऱ्या व्यक्तीला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल,’ असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ही प्रतियोगिता जिंकणाऱ्या विजेत्यास ५ हजार रुपये व ई-सर्टिफिकेट दिले जाईल. याशिवाय अन्य तीन विजेत्यांनाही पुरस्कार व ई-सर्टिफिकेट दिले जाणार आहे.

कसे कराल रजिस्ट्रेशन
या प्रतियोगीतेत भाग घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा myGov.in पोर्टलवर जायचे आहे. यात कॉंटेस्टवर जाऊन तुम्हाला पार्टिसिपेट टॅबवर क्लिक करायचे आहे. यानंतर संपुर्ण माहिती भरुन तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल.

हेही वाचा- मज्जाही करा अन् लसही घ्या, दिल्लीतील ट्रॅव्हेल कंपनी देतेय ‘इतक्या’ रुपयांत थेट रशियाला नेऊन लस

Comments are closed.