मज्जाही करा अन् लसही घ्या, दिल्लीतील ट्रॅव्हेल कंपनी देतेय ‘इतक्या’ रुपयांत थेट रशियाला नेऊन लस

भारत देशात विदेशात जाऊन वॅक्सिन पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात मॉस्को शहर वॅक्सिन पर्यटनासाठी सर्वात आवडते ठिकाण मानले जात आहे. एका वृत्तपत्रानुसार दिल्लीतील एक ट्रॅव्हेल कंपनी ही पर्यटकांना २४ दिवसांचे पॅकेज देत आहे. यात २१ दिवसांमध्ये लसीचे डोस व मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग शहरांत पर्यटन करायला मिळणार आहे.

रशियात ७ दिवस राहणार असाल तर तुम्हाला वॅक्सिन दिले जाते. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागते. नोंदणीचे काम देखील ही ट्रॅव्हेल कंपनी करते. या कंपनीकडून जर तुम्ही गेलात तर पोहचल्याच्या पुढच्याच दिवशी तुम्हाला Sputnik-V लसीचा पहिला डोस दिला जातो.

स्पुतनिक वीच्या अधिकृत अकाऊंटवर ३ एप्रिल रोजी वॅक्सिन टुरिझमवर टिझर प्रदर्शित केला होता. ‘रशियात Sputnik V वॅक्सिनेशन’ असे त्याला कॅप्शन देण्यात आले होते. ‘जेव्हा आम्ही हा उपक्रम सुरु करु तेव्हा आम्ही आमच्या फॉलोवर्सला रशियात आमंत्रित करतोय,’ असा ट्विट या अकाऊंटवरुन करण्यात आले होते.

दिल्ली शहरातून वॅक्सिन पर्यटनासाठी पहिला ग्रुप १५ मे रोजी रवाना झाला. या ३० लोकांमध्ये सर्वाधिक डॉक्टर्स आहेत, जे गुरुग्राममधील आहे. त्यांना पहिला डोसही देण्यात आला आहे. २९ मे रोजी दुसरा ग्रुप मॉस्कोला जाणार असून यातही बरेच डॉक्टर्स आहेत. त्यानंतर जुन महिन्यात पुढचा ग्रुप मॉस्कोला जाणार आहे. सध्या मॉस्कोला गेलेले लोक हे ३ दिवस सेंट पीटर्सबर्ग तर बाकी दिवस मॉस्को शहरात घालवणार आहेत.

या संपुर्ण पॅकेजची किंमत १ लाख ३० हजार असून यात दिल्ली ते मॉस्को व मॉस्को ते दिल्ली रिटर्न विमान तिकीट, नाश्ता, रात्रीचे जेवण व काही दिवसांसाठी पर्यटन स्थळांना भेटी अशा गोष्टींचा समावेश आहे. याशिवाय १० हजार रुपयांचे व्हीजा शुल्क वेगळे द्यावे लागणार आहे. रशिया त्या देशांपैकी एक देश आहे, जो आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असेल तर भारतीय पर्यटकांना आपल्या देशात येण्यास परवानगी देतो व यासाठी तुम्हाला क्वारंटाईन होण्याचीही गरज नाही.

Comments are closed.