ऐकावं ते नवलच, फ्लाईट चुकली म्हणून रेल्वेने दिली नुकसानभरपाई
प्रवाशांचा वेळ मौल्यवान आहे आणि विलंबासाठी कोणीतरी जबाबदार असलेच पाहिजे असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. “हे स्पर्धेचे दिवस आहेत. जर सार्वजनिक क्षेत्रात वाहतूक टिकवायची असेल आणि खाजगी प्लेअरशी स्पर्धा करायची असेल, तर रेल्वेस आपल्या व्यवस्थेत सुधारणा करावी लागेल. प्रशासनाने यासाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे.” असा शेरा या खंडपीठाने नोंदवला.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी असा युक्तिवाद केला की भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशन कोचिंग टॅरिफ क्रमांक २६ भाग -१ (खंड -१) चे नियम ११४ आणि नियम ११५ पाहता, कोणत्याही विलंबासाठी भरपाई देण्याची जबाबदारी रेल्वेची असणार नाही. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने शुक्लाना ९ टक्के व्याजासह ३०,००० रुपये नुकसानभरपाई देण्याचे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय ग्राहक मंचांचे आदेश कायम ठेवले.
Comments are closed.