आता सगळ्यांना वापरता येणार इन्स्टाग्रामचे ‘हे’ फिचर
The new feature will allow all users to provide third party website links
फेसबुकच्या मालकीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम लवकरच स्वाईप अप हे फीचर काढून टाकत आहे. हे फिचर वापरून इंस्टाग्रामवरील क्रिएटर्स आणि ब्रॅण्ड्सना आपल्या फॉलोवर्सला थर्ड पार्टी वेबसाईटकडे डायरेक्ट करता येत असे. इन्स्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांना ऍपमधील नोटिफिकेशनद्वारे याची माहिती देत आहे आणि ३० ऑगस्टपासून हे फीचर बंद होइल.
स्वाईप अप बंद होणार असले तरी इन्स्टाग्राम लिंक स्टिकर् हे आता त्याची जागा घेणार आहे. याद्वारे वापरकर्त्यांना वेबसाइटवर डायरेक्ट करण्यासाठी हे फीचर वापरले जाऊ शकते. इन्स्टाग्राम स्टोरीज आणि पोस्टमध्ये स्टिकर्सचा आधीच वापर केला जात आहे. आता या नव्या स्टिकरवर क्लिक करून वापरकर्ते थर्ड पार्टी वेबसाईटवर जाऊ शकतील.
कंपनीच्या मते, स्वाइप अप फंक्शनपेक्षा इन्स्टाग्रामचा वापर करणाऱ्यासाठी स्टिकर्स जास्त योग्य वाटतात. वापरकर्ते स्टोरीज नेव्हिगेट करण्यासाठी डावीकडे आणि उजवीकडे स्वाइप करतात.तर जाहिरातदार आणि निवडक वापरकर्त्यांसाठी स्वाइप अप फंक्शन हे ऑफर केले जात होते. त्याचा वापर ते उत्पादने विकण्यासाठी करू शकत होते.
लिंक स्टिकर्सची जूनपासून चाचणी सुरू आहे. याद्वारे कोणत्याही इन्स्टाग्राम वापरकर्त्याला संबंधीत प्लॅटफॉर्मवर लिंक शेअर करण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते. हा एक मोठा बदल असू शकतो. कारण स्वाइप अप फंक्शन हे एक प्रकारचे प्रीमियम फीचर होते, जे केवळ १०००० पेक्षा जास्त फॉलोवर्स आणि जाहिरातदार यांना ऑफर केले जात होते.
इंस्टाग्रामच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितले की, कंपनी हे फीचर अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवायचे की ते फक्त काही निवडक ब्रँडपर्यंत मर्यादित ठेवायचे याचे अद्याप मूल्यांकन करत आहे. प्लॅटफॉर्मवरील लिंक स्टिकर्सचा वापर कसा करायचा हे कंपनी ३० ऑगस्टला देणाऱ्या अपडेटनंतर ठरवणार आहे.
Comments are closed.