१० कोटी ग्राहकांना जिओ देणार फ्री आऊटगोईंग – शेअरच्या किंमतीत वाढ
Reliance Jio launched two news offers for Jio Phone users
रिलायन्स जिओने आज त्यांच्या ग्राहकांसाठी दोन नव्या स्कीम लाँच केल्या. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास १.५% ची वाढ झालेली पाहावयास मिळाली. जिओने आपल्या ग्राहकांसाठी नक्की कोणत्या स्कीम लाँच केल्या आहेत?
कंपनीने जिओफोन वापरणाऱ्या आपल्या ज्या ग्राहकांना आऊटगोईंगसाठी ३०० फ्री मिनिटे देणारी स्कीम आणली आहे. ज्या ग्राहकांना करोनामुळे आपला जिओफोन रिचार्ज करणे जमले नाही, त्या ग्राहकांसाठी ही स्कीम आहे असे कंपनीने एका पत्रकामार्फत जाहीर केले आहे.
याबरोबरच जिओफोन वापरणारे ग्राहक जेवढ्या किमतीचे रिचार्ज करतील तेवढ्याच किमतीचा आणखी एक रिचार्ज प्लॅन त्यांना फ्री मिळणार आहे. म्हणजे एखाद्या ग्राहकाने १०० रुपयांच्या प्लॅनने रिचार्ज केले तर त्याला १०० रुपयांच्या प्लॅनचे आणखी एक रिचार्ज फ्री मिळणार आहे. या योजनेचा जवळपास १० कोटी ग्राहकांना फायदा होईल असे कंपनीने म्हटले आहे.
रिलायन्स कंपनीचा शेअर गेले अनेक दिवस १९०० ते २०० दरम्यान रेंगाळतो आहे. सप्टेंबर २०२० मध्ये शेअरने आपला ५२ वीक हाय २३६८ नोंदवला होता. तर २० मे २०२० रोजी ५२ वीक लो १३९३ नोंदवला होता. सध्या शेअर ५२ वीक हाय किमतीपेक्षा १८% कमी किमतीवर ट्रेंड करतो आहे.
Comments are closed.