प्रत्येक आयपीओ येतो तेव्हा त्या शेअरच्या ग्रे मार्केट प्राईसबद्दल चालू असलेली चर्चासुद्धा ऐकायला येते. भविष्यात अनेक कंपन्या लिस्ट होणार त्याची आत्ता अनलिस्टेड मार्केटमध्ये किती किंमत आहे अशीसुद्धा चर्चा असते. आज आपण अश्याच काही अनलिस्टेड कंपन्यांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.
एचडीबी
एफआयआयची आवडती कंपनी म्हणून प्रसिध्द असलेली एचडीएफसी ग्रुपची एक कंपनी एचडीबी फायनान्शियल सर्व्हिस ही अजून स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झालेली नाही. २००८ साली सुरू झालेली ही कंपनी फायनान्स देणारी नॉन बँकिंग क्षेत्रातील म्हणजेच एनबीएफसी म्हणून एक अग्रेसर कंपनी आहे. ही कंपनी फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप ज्यांना आपण कन्झ्युमर गुड्स म्हणतो अशा वस्तू घेण्यासाठी ग्राहकांना कर्ज देते.
एचडीएफसी बँकेचे या कंपनी मध्ये ९५% स्टेक आहेत. या कंपनीची अनलिस्टेड मार्केटमध्ये १००० रुपये किंमत आहे.
एनएसई
नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड (NSE) ही भारताची सर्वात मोठी स्टॉक एक्सचेंज कंपनी आहे. दिवसाला होणाऱ्या शेअर्सच्या ट्रेडिंग ची संख्या पाहिली तर ही कंपनी जगात दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी कंपनी आहे. NSE ने १९९४ साली इलेक्ट्रॉनिक स्क्रीन वर आधारित ट्रेडिंग तर डेरीव्हेटिव ट्रेडिंग २००० साली पहिल्यांदा भारतात आणले.
या कंपनी मध्ये एलआयसीचे १२.५१% तर एसबीआयचे ४.४२% आणि स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ४.४४% स्टेक आहेत. या कंपनीच्या शेअर ची किंमत २२०० रुपये आहे.
रिलायन्स रिटेल
रिलायन्स ही कंपनी निफ्टी५० च्या प्रमुख कंपन्यां मधील एक कंपनी आहे. बहुतेक वेळा रिलायन्सच्या शेअर वर निफ्टी सुद्धा हालते. याच रिलायन्स ग्रुप ची रिलायन्स रिटेल ही एक कंपनी आहे. रिलायन्स रिटेल मध्ये रिलायन्स फ्रेश, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स मार्केट स्टोअर, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डिजिटल मिनी एक्स्प्रेस, रिलायन्स ट्रेंड्स, रिलायन्स जिओ स्टोअर्स, ट्रेंड्स वुमन, रिलायन्स फूट प्रिंट, रिलायन्स ज्वेल्स, आजिओ डॉट कॉम सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
रिलायन्स रिटेल वेंचर्स यांचे ९९.९५% स्टेक्स या कंपनी मध्ये आहे.
या कंपनीच्या शेअरची किंमत १९८० रुपये आहे.
हिरो फिन कॉर्प
१९९१ साली मान्यता मिळालेल्या हिरो फिन कॉर्प लिमिटेड या कंपनीचे २०२० पर्यंत ९३८ डीलर्स आहेत तर १९०० पेक्षा अधिक शहरात आणि ४००० पेक्षा अधिक गावात शाखा आहेत. २०२० या फायनान्शियल वर्षात हिरो फिन कॉर्प ही दुचाकी वाहनांना फायनान्स भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी ठरली आहे.
हिरो मोटोकॉर्पचे या कंपनी मध्ये ४१.०३% स्टेक आहेत. ३१ मार्च २०२० पर्यंत या कंपनी मध्ये ७५०० कर्मचारी आहेत. ३१ मार्च २०२० पर्यंत कंपनीचे असेट २५१८२ कोटी एवढे आहेत.
या कंपनीच्या शेअर ची किंमत आज ११७० रुपये आहे.
कर्ल ऑन
कर्ल ऑन हा भारतातील विकला जाणारा सर्वात मोठा मॅट्रेस चा ब्रँड आहे. कर्ल ऑन या कंपनीचा मॅट्रेस मध्ये ३५ ते ४० टक्के मार्केट शेअर आहे. तसेच फोम बनवणारी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे १२ मॅन्यूफॅक्चरिंग युनिट, ४ रिजनल वेअर हाऊस आणि ७० शाखा आहेत.
या कंपनीच्या शेअर ची किंमत ४५० रुपये आहे.
टाटा टेक्नॉलॉजी
टाटा टेक्नॉलॉजी ही १९८९ साली सुरू झालेली टाटा ग्रुपचीच एक कंपनी आहे. १९८९ पासून ही कंपनी जगातील मोठ्या मोठ्या मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांना इंजिनिअर्स आणि डिझाईन सर्व्हिस पुरवते. या कंपनीचे सर्वात मोठे शेअर होल्डर टाटा मोटर्स ही कंपनी आहे.
या कंपनीचा शेअर १९४० रुपये किंमतीला आहे.
मोहन मिकन
मोहन मिकन या कंपनीचा ओल्ड मॉंक रम हा सर्वात प्रसिद्ध ब्रँड आहे. ही कंपनी डेट फ्री असल्याने कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे. या कंपनीत एलआयसी ८.३१% स्टेक आहे.
या कंपनीचा शेअर १२५० रुपये किंमतीला आहे.
Comments are closed.