‘पैसापाणी’ आयोजित ‘शेअर मार्केट ट्रेडिंग वर्कशॉप’ संपन्न, प्रवीण पाटील यांनी केले मौल्यवान मार्गदर्शन
The workshop was organized by Paisapani and focused on role of human psychology while share trading
पुणे, २४ ऑक्टोबर: ‘पैसापाणी’ आयोजित ‘शेअर मार्केट ट्रेडिंग वर्कशॉप’ रविवारी (२४ ऑक्टोबर) पुण्यात पार पडले. यावेळी प्रसिद्ध शेअर मार्केट ट्रेडर प्रवीण पाटील यांनी सहभागी ट्रेनींना उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेकांनी सहभाग नोंदवला होता.
शेअर मार्केटमधे गुंतवणूक करताना अनेकांना अनेक प्रश्न असतात. यातील तांत्रिक बाबी जरी माहित असल्या, तरीही यातील सायकॉलॉजी अर्थातच मानसिकतेत अनेकजण मागे पडतात व अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात. शेअर मार्केटमधे वावरताना सायकॉलॉजीला जर महत्त्व दिले, तर यश मिळण्याची संधी नक्कीच वाढते. हाच क्लिष्ट विषय हातात घेऊन ‘पैसापाणी’ने प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावर उत्तरं शोधण्यासाठी या वर्कशॉपचे आयोजन केले होते.
पाटील यांनी आपल्या वर्कशाॅपमधे ट्रेडिंगबद्दलचे गैरसमज, यशस्वी ट्रेडिंगचा पाया, विविध ट्रेडिंग स्ट्रॅटेजी यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर मत मांडले. याशिवाय यशस्वी ट्रेडिंगसाठीचे मानसशास्त्र या विषयावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. यामध्ये ट्रेडिंग करताना मानवी विचारसरणी कशी असते? त्यासाठी कोणते घटक विचारात घेतले पाहिजेत? ट्रेडिंग करताना काय खबरदारी घ्यावी? यावर त्यांनी अधिक भर दिला.
अखेरच्या सत्रात पाटील यांनी यशस्वी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी विकसित करण्यासाठी काय करावे? याबाबत मार्गदर्शन केले. सहभागी सदस्यांच्या आग्रहास्तव त्यांनी एका स्ट्रॅटेजीचा डेमोदेखील दाखवला.
यावेळी पैसापाणीचे चिन्मय रेमणे, शरद बोदगे, आदित्य गुंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमृता कारेकर यांनी केले तर नचिकेत धारणकर यांनी आभार प्रदर्शन केले.
पैसापाणीबद्दल थोडक्यात-
‘पैसापाणी’ ही मराठी भाषेत शेअर मार्केटसंबंधीत काम करणारी पुणेस्थित संस्था आहे. या संस्थेने गेल्या काही काळात शेअर मार्केटमधे काम करत असलेल्या व या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांमध्ये साक्षरता निर्माण करण्याचे काम केले आहे. चिन्मय रेमणे, शरद बोदगे, आदित्य गुंड व नचिकेत धारणकर ही या संस्थेशी संबंधित नावे असून अर्थ विषयाशी संबंधीत कंटेंट, मार्गदर्शन पुरविण्याचं काम ही संस्था करते.
प्रवीण पाटील यांच्याबद्दल-
प्रवीण पाटील हे १३ वर्षांपासून शेअर मार्केटमधे काम करत असून या क्षेत्रातील एक मोठं नाव आहेत. ते एक दिग्गज ‘फुल टाईम ट्रेडर’ म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाचा आजपर्यंत अनेकांना फायदा झाला आहे. एका मध्यमवर्गीय कुटूंबातून येऊन एक यशस्वी ट्रेडर होण्याचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
Comments are closed.