अवघड सोप्पं झालं हो! घरबसल्या असे करा एसबीआयच्या एका ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये सेव्हिंग अकाऊंट ट्रान्सफर
How to transfer your SBI savings account to another branch via SBI YONO, YONO Lite and OnlineSBI
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयकडे पाहिले जाते. या बँकेचे देशात सर्वाधिक ग्राहक, सर्वाधिक शाखा व सर्वाधिक एटीएम मशीन आहेत. भारतात असे कोणतेही शहर नाही, जिथं एसबीआयची शाखा नाही. अशा ही देशातील सर्वात मोठी बँक ग्राहकांच्या दृष्टीने सतत योग्य निर्णय घेऊन चांगल्या सुविधा पुरविण्याचे काम करते. अशीच एक सुविधा म्हणजे ब्रँच चेंज करणे अर्थात आपल्या होम ब्रँंचमध्ये बदल करणे.
काही ग्राहक हे कामानिमीत्त वेगळ्या शहरात, गावात किंवा खेड्यात राहायला जातात. अशावेळी त्यांना नविन खाते सुरु करावे की जुन्यावर हे व्यवहार सुरु ठेवता येतील असा मोठा प्रश्न असतो. अनेक वेळा ग्राहकांना नविन खात्यापेक्षा जुनेच खाते ट्रान्सफर करुन मिळावे, अशी अपेक्षा असते. याचसाठी एसबीआयने ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे.
एसबीआय तीच्या ग्राहकांना एका शाखेतून (ब्रॅंचमधून) दुसऱ्या शाखेत आपले सेव्हिंग अकाऊंट ट्रान्सफर करण्याची सुविधा देते. विशेष म्हणजे हे सगळे तुम्ही ऑनलाईन करु शकता. यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष आपल्या होम ब्रँचमध्ये जावे लागत नाही. अगदी कोरोना सुरु झाला, त्यापुर्वीपासून ही सुविधा बँकेने उपलब्ध करुन दिलेली आहे.
एसबीआयने शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “जर तुम्हाला आपले सेव्हिंग खाते एका ब्रॅंचमधून दुसरीकडे ट्रान्सफर करायचे असेल तर योनो एसबीआय, योनो लाईट व ऑनलाईन एसबीआय या पर्यायांचा वापर करा.”
If you need help in transferring your account from one branch to another, then SBI has got your back.
Use YONO SBI, YONO Lite and OnlineSBI from the comfort of your homes and bank safe.#SBIAapkeSaath #StayStrongIndia #YONOSBI #YONOLite #OnlineSBI #BankSafe pic.twitter.com/WlW8bb8aBG
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 7, 2021
हे अतिशय सोप्पं काम आहे मंडळी. आज आम्ही पैसापाणीच्या वाचकांना याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
या पद्धतीचा वापर करुन करा एका एसबीआय ब्रँचमधून दुसऱ्या ब्रँचमध्ये खाते ट्रान्सफर
– एसबीआयची अधिकृत वेबसाईट ‘www.onlinesbi.com’. वर प्रथम लॉग-इन करा.
-त्यानंतर इ-सर्विसेस या पर्यायावर क्लिक करा.
-यानंतर तुम्हाला ट्रान्सफर द सेविंग अकाऊंट (‘Transfer of savings account’) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
-त्यानंतर तुमच्या ट्रान्सफर करु इच्छित असलेल्या खात्याची निवड करा. तुमचे CIF अर्थात Customer Information File अंडर एकच खाते असेल तर तुम्हाला खाते निवडण्याचीही गरज पडणार नाही.
– त्यानंतर ज्या ब्रँचमध्ये तुम्हाला हे खाते ट्रान्सफर करायचे आहे, त्या ब्रँचचा ब्रँच कोड टाका.
-त्यानंतर terms and condition तुम्हाला मान्य असतील तर Submitवर क्लिक करा.
-त्यानंतर एकदा तुमच्या सध्याच्या ब्रँचचा कोड व नव्या ब्रँचचा कोड तपासून पाहा व ‘Confirm’ वर क्लिक करा.
-यानंतर तुमच्या एसबीआय अकाऊंटसोबत जोडलेल्या भ्रमनध्वनीवर एक ओटीपी अर्थात वन टाईम पासवर्ड येईल.
-ओटीपी टाकण्याच्या जागी भ्रमणध्वनीवर आलेला क्रमांक टाका.
-यानंतर तुम्हाला एक मेसेज दिसेल. त्यात लिहीलेलं असेल, ‘Your branch transfer request has been successfully registered’. याचाच अर्थ तुमचे सेव्हिंग खाते हे इच्छित ब्रँचमध्ये ट्रान्सफर झाले आहे.
हे सर्व करण्यासाठी तुमचा भ्रमणध्वनी सेव्हिंग खात्याशी जोडलेला असणे गरजेचे आहे. वरच्या सांगितलेल्या पद्धतीने ग्राहक योनो एसबीआय व योनो लाईट ऍपचा वापर करुनही ही प्रक्रिया पार पाडू शकतात.
विषय पैशांचाच आहे, तर हेही वाचा- डेथ सर्टिफिकेट नसले तरी एलआयसी देणार क्लेम सेटलमेंट
Comments are closed.