ठरलं एकदाचं, रुची सोयाचा FPO येणार
Ruchi Soya has received observations from SEBI on 14 August for their upcoming FPO
कंपनीने याबाबत सेबीकडे जूनमध्ये कागदपत्रे दाखल केली होती. त्यावर १४ ऑगस्ट रोजी सेबीने प्रतिक्रिया दिली. ड्राफ्ट पेपरनुसार, या इश्यूमधून उभ्या राहणाऱ्या संपूर्ण रकमेचा वापर हा थकित कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल.
एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे यात मुख्य व्यवस्थापक असतील. दिवाळखोरीत निघालेली ‘रुची सोया’ २०१९ मध्ये पतंजलीने ४३५० कोटी रुपयांना विकत घेतली होती.
प्रोमोटर्सकडे सध्या जवळपास ९९ टक्के स्टेक असून त्यांना या एफपीओच्या माध्यमातून किमान 9 टक्के स्टेक कमी करावा लागेल. सेबीच्या नियमानुसार, कंपनीमधील प्रमोटर्सचा स्टेक ७५% पर्यंत आणण्यासाठी रुची सोयाकाडी ३ वर्षांचा अवधी आहे.
रुची सोया प्रामुख्याने तेलबियांवर प्रक्रिया करणे, कच्चे खाद्यतेल शुद्ध खाद्य तेल म्हणून वापरण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे, सोया प्रोडक्ट तयार करणे तसेच इतर मूल्यवर्धित उत्पादने यांचा व्यवसाय करते.
कंपनी पाम आणि सोया सेगमेंटमध्येदेखील व्यवसाय करते ज्यात फार्म टू फोर्क बिझनेस मॉडेल आहे. यामध्ये महाकोश, सनरीच, रुची गोल्ड आणि नुट्रेलासारखे ब्रँड आहेत.
मे मध्ये, रुची सोया कंपनीने पतंजली नॅचरल बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेड (PNBPL) कडून ६०.०२ कोटी रुपयांत बिस्किटांचा व्यवसाय विकत घेतल्याची घोषणा केली होती. याचा मुख्य कंपनीच्या विद्यमान उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करणे होता.
Comments are closed.