“सेबी” न पकडलं,”वाडीया” न सोडलं. अखेर गोफर्स्ट चा IPO हवाई सफारीवर!

GoFirst IPO back on track after Wadias resolve SEBI enquiry

मार्केट रेग्युलेटर द्वारे सुरु असणारी प्रलंबित चौकशी वाडिया यांच्या मध्स्थीने सुटल्यानंतर गोफर्स्टचा ३,६०० कोटी रुपयांचा आयपीओ आता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत लिस्ट होण्याच्या मार्गावर आहे.

बॉम्बे डाईंग मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आणि वाडिया विरोधात प्रलंबित असलेल्या चौकशीमुळे सेबीने गोफर्स्टचा आयपीओ जो पूर्वी गोएअर म्हणून ओळखला जात होता तो निलंबित केला होता.

एअरलाईनच्या कामकाजाची माहिती असलेल्या व्यक्तीने माध्यमांना सांगितले की, एअरलाईनने सेबीला स्पष्टीकरण देताना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

”त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की या वर्षी जूनमध्ये बॉम्बे डाईंग आणि त्याचे प्रमोटर वाडिया यांना सेबीच्या सीएफआयडी विभागाकडून कथित आर्थिक अनियमिततांसाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

सेबीचे नियम काय सांगतात

सेबीच्या नियमात महत्वाचा मुद्दा म्हणजे आयपीओसाठी निरीक्षण नोंदवणे हा आहे. सामान्यतः सेबी आयपीओच्या कागदपत्रांवर ३० दिवसात आपली निरीक्षणे नोंदवते.

ज्या प्रकरणांमध्ये सेबीला असे वाटते की तपासाचे एक निश्चित कारण आहे किंवा तपास आधीच सुरू आहे परंतु कोणतीही कारणे दाखवा नोटीस जारी केली गेली नाही, त्यावेळी सेबी ३० दिवसांसाठी ते प्रकरण तसेच पुढे चालू ठेवू शकते.

ज्याठिकाणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, तेथे सेबी ९० दिवसांसाठी पुढील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया बंद ठेवू शकते.

गो फर्स्ट आयपीओ मधून येणारे २००० कोटी रुपये कर्ज कमी करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरत आहे. तर उर्वरित १६०० कोटी हे भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एअरलाइनचे वर्चस्व वाढवण्यासाठी वापरले जातील.

भारतातील हवाई प्रवासाला कोविडमुळे मोठा फटका बसला आहे परंतु आता ते पुन्हा रुळावर परत येत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे चालू झाल्यानंतर इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका आणि नेपाळ पर्यंत ऑपरेशन वाढवण्याचा गोफर्स्ट विचार करत आहे.

कंपनी संबधित एकाने सांगितले, की कोविड ची तिसरी लाट येण्याची चिन्हे नसल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत एअरलाइन देशांतर्गत प्रवासी वाहतूक सुमारे ९० टक्क्यांवर नेण्याच्या विचारात आहे.

आयपीओ लाँच करण्यापूर्वी गोफर्स्टने सांगितले की ते अल्ट्रा लो कॉस्ट कॅरियर (यूएलसीसी) म्हणून काम करेल. गोफर्स्टवर प्रवास करणाऱ्या सुमारे २० टक्के लोकांना अनेक सवलतींचा लाभ मिळेल.

Comments are closed.