अरे! अरे! अजून एक IPO, आता ‘ही’ फर्म आणतेय IPO
SoftBank Group backed Indian hospitality startup Oyo is expected to file for an IPO next week to raise around $1.2 billion
सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनूसार, सॉफ्टबँक ग्रुप पुरस्कृत भारतीय हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप ओयो पुढील आठवड्यात सुमारे 1 अब्ज डॉलर्स गोळा करण्यासाठी आयपीओ दाखल करण्याची अपेक्षा आहे. हे हॉटेल एग्रीगेटर मुंबईमध्ये लिस्टिंग करण्याचा विचार करीत आहे. IPO मध्ये शेअर्सचा नवीन इश्यू आणि विक्रीची ऑफर यांचा समावेश असेल.
ओयोमध्ये सॉफ्टबँकचा 46% स्टेक आहे आणि तो सर्वात मोठा आहे. कंपनीचे सीईओ रितेश अग्रवाल यांनी जुलैमध्ये म्हटले होते की भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेपूर्वी किंवा दरम्यान आम्ही व्यवसाय रुळावर आणण्याचा प्रयत्न करु.
गेल्या महिन्यात, ओयोने मायक्रोसॉफ्ट कॉर्प, कोटक महिंद्रा कॅपिटल, जेपी मॉर्गन आणि सिटी या IPO वर सल्ला देणाऱ्या बँकर्सकडून 5 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक प्राप्त केली, असे सूत्रानी सांगितले.
कंपनी तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करत आहे आणि अलीकडेच कंपनीने जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टसह पार्टनरशिपची घोषणा केली आहे.
कंपनीने एक सेल्फ साइन अप सेवा देखील सुरू केली आहे, ज्याद्वारे हॉटेल मालक 30 मिनिटांत प्लॅटफॉर्मवर लाईव्ह येऊ शकतील. या निर्णयामुळे व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे.
कोविडमुळे कंपनीने टेक्नॉलॉज वर भर दिला आहे, जेणेकरुन बऱ्याच सुविधा ऑनलाईन ऑफर केल्या जातील,आणि अडचणी वर तोडगा निघू शकेल.
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इंजिनीअरिंग, प्रॉडक्ट मॅनेजर, डिझायनर्स, डेटा सायंटिस्टसह एंट्री-लेव्हल इत्यादी 300 हून अधिक टेक्नॉलॉजी प्रोफेशनल नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे.
Comments are closed.