अमर राजा बॅटरीजवर लक्ष ठेवा – येत्या 5-7 वर्षात कंपनी करणार मोठी गुंतवणूक
Amara raja bets big on increasing demand of lithium-ion batteries
बॅटरी बनवणारी भारतातील आघाडीची कंपनी अमर राजा बॅटरीज पुढील पाच ते सात वर्षांत सुमारे एक अब्ज डॉलर्स कॅपेक्सवर खर्च करणार आहे. कंपनीच्या ऑरगॅनिक आणि इनऑरगॅनिक वृद्धीसाठी हा पैसा वापरण्यात येईल असे कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नुकतेच सांगितले.
याबाबत बोलताना कंपनीचे अध्यक्ष एस विजयानंद
म्हणाले की, “येणाऱ्या काळात बाजारात लीड ऍसिड बॅटरीजची मागणी कमी होत जाणार आहे. ही गोष्ट ध्यानात घेऊन कंपनी एनर्जी स्टोरेजमधील नवीन तंत्रज्ञानावर (ज्यात लिथिएम आयर्न बॅटरीचा समावेश होतो) जास्त लक्ष केंद्रित करणार आहे.”
“म्हणून आम्ही सरकारच्या ACC (Advanced Chemistry Cell) PLI (Production Linked Incentives) योजनेअंतर्गत 10 ते 12 गिगा वॉट अवर्स (लिथियम आयन बॅटरी) सुविधेसाठी सुमारे एक बिलियन डॉलर्स गुंतवणुक करणार आहोत. या योजनेची अंमलबजावणी होण्यासाठी लागणारा कालावधी मार्केट डिमांडवर अवलंबून आहे.”
मे महिन्यात केंद्राने एसीसी (अॅडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल) बॅटरीच्या निर्मितीसाठी पीएलआय (प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह) योजनेला अंदाजे 18,100 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला.
विजयानंद म्हणाले की, “अमर राजा दर वर्षी कॅपेक्सवर सुमारे 400 ते 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे.”
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “अमर राजा, पुढील पाच वर्षांत महसुलात 15 ते 17 टक्के वाढ होईल अशी अपेक्षा ठेवून वाटचाल करत आहे. यामुळे लवकरच कंपनीचे बाजारमूल्य दोन बिलियन डॉलर्स एवढे होईल.
अमर राजा बॅटरीजने आर्थिक वर्ष 2021 मध्ये 7,150 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आणि 647 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला.
विजयनंद म्हणाले की भविष्यातील गुंतवणूक ही उत्पादन वाढीच्या गरजा आणि निर्मात्यांच्या गरजांवर अवलंबून असेल.
अलीकडेच अमारा राजा मंडळाने हर्षवर्धन गौरीनेनी आणि विक्रमादित्य गौरीनेनी यांची कार्यकारी संचालक म्हणून कंपनीच्या बोर्डावर नेमणूक केली होतो.
Comments are closed.