आयपीओच आयपीओ – ग्लेनमार्क आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओला सेबीची मान्यता
Utkarsh Small Finance Bank and Glenmark Life Science had filed IPO papers with Sebi earlier this year
गेल्या काही महिन्यांत भारतीय बाजारात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले आहेत तर येणाऱ्या काळात बरेच आयपीओ येणार आहेत. यामध्ये आता ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या दोन कंपन्यांची भर पडली आहे. सेबीने या दोन कंपन्यांना आपला आयपीओ लाँच करण्यासाठी मान्यता दिली आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि ग्लेनमार्क यांनी अनुक्रमे मार्च आणि एप्रिल महिन्यांत आयपीओसाठी प्राथमिक कागदपत्रे सेबीला सादर केली होती.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आयपीओद्वारे ७५० कोटी रुपये तर ऑफर फॉर सेल द्वारे ६०० कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस आयपीओद्वारे ११६० कोटी रुपये उभे करणार आहे. तसेच ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सच्या ७३ लाख शेअर्सचीदेखील विक्री करणार आहे. या दोनही कंपन्यांना सेबीद्वारे ३ जून रोजी आयपीओसाठी मान्यता देण्यात आली.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक २००९ पासून मायक्रो फायनान्स बँक म्हणून कार्यरत होती. ४ वर्षांपूर्वी २०१७ मध्ये त्यांनी स्मॉल फायनान्स बँक म्हणून सुरुवात केली. सध्या बँक इतर मायक्रो फायनान्स बँकांना कर्जपुरवठा करते. सप्टेंबर २०२० अखेर उत्कर्ष स्मॉल फायनान्सची देशभरात ५२८ आउटलेट्स आहेत. २०१८-२० दरम्यान कंपनीची डिपॉझिट्स आणि डिसबर्समेंट्स अनुक्रमे ५४% आणि ३३% ने वाढली आहेत. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस ही ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सची सबसिडीअरी कंपनी आहे. कंपनी एपीआय बिझनेसमध्ये जास्त सक्रिय आहे.
Comments are closed.