रेन इंडस्ट्रीज उन्हाळ्यात पैशाचा पाऊस पाडणार का?

Will Rain Industries make investors happy?

सध्या बाजारात कमोडिटी सर्कल सुरू झाल्याची चर्चा आहे. या कमोडिटी सायकलचा फायदा होणाऱ्या काही स्टॉक्समध्ये समावेश होतो तो रेन इंडस्ट्रीज या शेअरचा. गेल्या ७-८ दिवसांत बरेच तज्ञ या शेअरबद्दल बोलू लागले आहेत.

खरंच रेनला या सायकलचा फायदा होईल का? कंपनी नक्की काय बनवते की ज्यामुळे लोक या स्टॉकबद्दल बुलिश आहेत?

कंपनीचे प्रॉडक्ट्स
१. कार्बन – CPC, CTP
२. ऍडव्हान्स मटेरियल्स – रेझिन्स, डेरिव्हेटिव्हज, पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स
३. सिमेंट

या तीनपैकी कार्बन बिझनेस सेगमेंट कंपनीच्या एकूण महसुलात आणि नफ्यात अनुक्रमे ६४% व ७०% एवढा मोठा वाटा उचलतो. त्याखालोखाल ऍडव्हान्स मटेरियल्स आणि सिमेंट सेगमेंट वाटा उचलतात. कंपनीचे एकूण १२ कार्बन प्लॅंट, ३ ऍडव्हान्स मटेरियल प्लॅन्ट आणि २ सिमेंट प्लॅन्ट आहेत.

कंपनीचे कस्टमर्स वेगवेगळ्या सेक्टरमधील आहेत. त्या प्रत्येक सेगमेंटकडून कंपनीच्या महसुलात किती वाटा आहे ते खालीलप्रमाणे

१. ऍल्युमिनियम – ३८%
२. कन्स्ट्रक्शन – १६%
३. कार्बन ब्लॅक – ७%
४. ग्राफाईट – ६%

याशिवाय वूड प्रिझर्व्हेशन, कोटिंग्ज, टायटॅनियम डायऑक्साइड, स्पेशालिटी केमिलक्स आणि इतर बरेच सेक्टर कंपनीचे प्रॉडक्ट्स वापरतात.

 

रेन इंडस्ट्रीजचा फायदा कुठे होतोय?
कंपनी कोल टार पिच (CTP)ची जगातील सर्वात मोठी प्रोड्युसर आहे तर  कॅल्सीनेटेड पेट्रोलियम कोक (CPC) ची दुसऱ्या क्रमांकाची प्रोड्युसर आहे. रेन इंडस्ट्रीजचे ८ वेगवेगळ्या देशांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लॅंट्स आहेत.  कंपनीचे CPC चे एकूण ७ युनिट आहेत आणि ८ व्या युनिटचे काम प्रगतीपथावर आहे. CTP साठी कंपनीचे एकूण ४ कोल डीस्टीलेशन प्लँट आहेत. हे प्रॉडक्ट्स जिथे रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात ते ऍल्युमिनियम, स्टील, टायटॅनिअम हे सेक्टर करोनानंतर पूर्वपदावर येत आहेत. कंपनीचे प्रमुख प्रॉडक्ट कोल टार पिचची किमंत गेल्या तीन महिन्यांत ४०% वाढली आहे. सध्या ७७० डॉलर प्रति टन असलेली ही किंमत लवकरच ऑल टाइम हाय ११०० डॉलर प्रति टन पर्यंत जाईल असा अंदाज आहे. कॅल्सीनेटेड पेट्रोलियम कोकची किंमत ३२% ने वाढून ३८५ डॉलर प्रति टन एवढी झाली आहे. ती अशीच वाढत जाऊन ४९० डॉलरचा ऑल टाइम हाय पर्यंत जाऊ शकते.

ऍडव्हान्स मटेरियल्समध्ये कंपनीने काही नवे प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. कंपनी इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स विकसित करण्यावर भर देते आहे. या सेगमेंटचा पूर्ण बिझनेस कंपनी जर्मनी, कॅनडा आणि नेदरलँड्स या तीन देशांतून चालवते.

कंपनीचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यात सिमेंट प्लँट आहेत. या दोन्ही प्लँटची मिळून ४ मिलियन टन्स एवढी वार्षिक क्षमता आहे. कंपनीकडे सिमेंट बनवण्यात महत्वाचा कच्चा माल असलेल्या लाईमस्टोनच्या खाणींचे ५० वर्षांचे लीज आहे.

कंपनीने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक आकडेवारीत ३१ डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ कंपनीने डेटचा आकडा ९३२ मिलियन डॉलर्सवरन ९०० मिलियन डॉलर्सपर्यंत खाली आणला आहे. याच तिमाहीत कंपनीने २०६ कोटींचा नफा कमावला आहे जो गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये १०६ कोटी एवढा होता.

 

कंपनीच्या शेअरने नोव्हेंबर २०२० मध्ये १०२ रुपये ते आता ३० एप्रिल २०२१ ला १८८ रुपये एवढी मजल मारली आहे. वर म्हटल्याप्रमाणे कंपनीच्या प्रॉडक्ट्सच्या वाढत्या किमतीचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किंमतीवर होताना दिसतो आहे.  येणाऱ्या काळात ईव्हीची संख्या वाढत जाणार आहे, या गाड्यांमध्ये ऍल्युमिनिअमचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या वाढणाऱ्या मागणीचा थेट परिणाम रेन इंडस्ट्रीजवर होईल असा अंदाज आहे.

Comments are closed.