भारतात तयार होतोय नवीन QSR लीडर…

देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड ही भारतातील यम ब्रँड्सची सर्वात मोठी फ्रँचायझी आणि भारतातील क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स चेनच्या सर्वात मोठ्या ऑपरेटरपैकी एक आहे. देवयानी इंटरनॅशनल ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतातील १५५ शहरांमध्ये ८३८ स्टोअर्स (३३९ KFC आणि ३९१ पिझ्झा हट) चालवते.

मागील वर्षीच या कंपनीचा आयपीओ आला आणि स्टॉकने चांगली लिस्टिंग गेन सुद्धा दिली पण पुढे काय? कंपनी मध्ये काय बदल झाले आहेत कंपनीचे भविष्यातील प्लॅन्स काय आहेत या सगळ्यांवर आपण या थ्रेड मधून नजर टाकू. मागील ६ महिन्यात कंपनीच्या फंडामेंटल्समध्ये अनेक चांगले बदल दिसून येत आहेत हे बदल दिसून येणाऱ्या बदलाची प्रमुख कारणे आपण पाहू…
DIL (देवयानी इंटरनॅशनल्स) ने KFC आणि पिझ्झा हट साठी काही महत्वपूर्ण बदल केले आहेत ते खालीलप्रमाणे
• स्टोअरच्या आकारात घट
• आधीपेक्षा सुधारित मेनू
• डेल्को स्टोअर्ससोबत डिलिव्हरी वर अधिक लक्ष
• डिजिटल सुधारणा

पिझ्झा हटचा टर्नअराउंड:

• या आधी पिझ्झा हटचे स्टोअर्स हे मोठे होते, ज्यामुळे अधिक खर्च आणि Domino’s पेक्षा विक्री सुद्धा कमी होती तसेच त्यांची डिलिव्हरी सर्व्हिस सुद्धा dominos पेक्षा खराब होती, डिलिव्हरी हा पिझ्झा मार्केटमधील मोठा आणि महत्वाचा भाग आहे.

पिझ्झा हटने आता डिलिव्हरी फॉरमॅट प्रमाणेच त्यांचे स्टोअर सुद्धा पुन्हा मॉडिफाय केले आहे, जे आकाराने लहान आहे आणि तिथे सिटिंग क्षमता सुद्धा कमी आहे. याआधी पिझ्झा हट च्या एका स्टोअर ची साइज २००० sq/ft एवढी होती जी आता ८०० ते १००० पर्यंत कमी केली आहे तर Domino’s च्या स्टोअर ची साइज १४०० ते १६०० sq/ft एवढी आहे.
या स्टोअरमध्ये अजूनही मोठ्या स्टोअरच्या तुलनेत समान एडीएस (Average Daily Sales) आहेत तसेच सेल्स मध्ये वाढ होत आहे, आणि त्यांनी वापरात येत नसलेली बसण्याची क्षमता सुद्धा काढून टाकल्यामुळे त्याचा फायदा त्यांना फिक्स कॉस्ट कमी करण्यात झाला आहे.

KFC टर्नअराउंड:

• KFC ही DIL साठी अधिक स्थिर आणि फायदेशीर फ्रँचायझी आहे, DIL च्या नफ्यातील 70% वाटा KFC चा आहे. स्टोअर आकाराचे अलीकडील ऑप्टिमायझेशन, मेनू ऑफरिंग आणि डिलिव्हरी/डिजिटल विक्रीवर लक्ष केंद्रित केल्याने त्याच्या स्टोअर मेट्रिक्समध्ये सुधारणा झाली आहे.

• स्टोअरच्या आकारात घट होऊनही, KFC ने FY19 पासून स्टोअर मार्जिनमध्ये 500bps विस्तार केला आहे. KFC चे एक स्टोअर ₹13 मिलियनच्या कॅपेक्सवर 22%+ च्या स्टोअर मार्जिनसह ₹4 कोटीचा सेल्स करते, त्यांच्या युनिटचे ROCE 50% पेक्षा जास्त आहे जे याच सेगमेंट मधल्या बाकी कंपन्यांपेक्षा जास्त आहे.

DILs ग्रोथ स्ट्रॅटेजी:

त्यांच्या नेटवर्क विस्ताराचा वेग

गेल्या ३ वर्षात ५-७% स्टोअर ॲडिशन्सच्या तुलनेत, DIL ने दरवर्षी सुमारे २५० स्टोअर्स जोडण्याची आणि सध्याच्या ८००+ स्टोअर्सवरून FY२५ पर्यंत १,५००+ वर ३ वर्षांमध्ये दुप्पट करण्याची योजना आखली आहे.

आता त्यांचे ३ मुख्य व्यवसाय KFC, पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफी यावर एक नजर टाकू

1) KFC:
KFC चा चिकन विकणाऱ्या देशांतर्गत QSR स्पेसमध्ये ७०%+ एवढा मार्केट शेअर आहे.
गेल्या ४ वर्षात KFC ने ५% ने आपल्या स्टोअरचा बिझनेस वाढवला आहे आणि त्याचबरोबर कमाईच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत QSR ब्रँड बनला आहे, तो McDonald’s च्या अगदी किरकोळ मागे आहे.

DIL संपूर्ण दक्षिण आणि पूर्व राज्यांमध्ये KFC चालवते, जिथे चिकन खाणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. भारतात ७०% पेक्षा अधिक लोक मांसाहारी आहेत आणि त्यात चिकन हे सर्वाधिक प्रमाणात सेवन केले जाणारे उत्पादन आहे. त्यामुळे DIL कडे KFC साठी मोठी बाजारपेठ आहे.

२) पिझ्झा हट
पिझ्झा हट कमी स्टोअर आकार आणि चांगले युनिट मेट्रिक्ससह जोरदार पुनरागमन करेल आणि पुढील काही वर्षांत मार्केट लीडर आणि त्यांच्यात असलेले अंतर कमी करेल अशी अपेक्षा आहे. डीआयएलकडे संपूर्ण भारतातील पिझ्झा हटचे लहान आकाराचे डेल्को स्वरूपाचे स्टोअर उघडण्याचे विशेष अधिकार आहेत

यामुळे टियर २ आणि ३ शहरांमध्ये स्टोअर ओपन करून ब्रँड वाढवायची चांगली संधी आहे तसेच टियर १ आणि २ च्या शहरांमध्ये अधिक स्टोअर्स उघडण्याची सुद्धा मोठी संधी आहे. यामुळे पिझ्झा हटला अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे त्यांचा मार्केट शेअर वाढेल. .

पिझ्झा हटला मेनू मध्ये केलेल्या बदलांचा सुद्धा फायदा होतो आहे. त्यांच्या नवीन मेनूची स्टोअर मध्ये मागणी तर वाढतेच आहे त्याबरोबरच डिलिव्हरी ऑर्डर सुद्धा वाढत आहेत.
पिझ्झा हटने नवीनच लाँच केलेला पदार्थ मोमो मिया जो पिझ्झा आणि मोमोस यांचे मिश्रण आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि रिव्हियू सुद्धा चांगले आहेत.

3) कोस्टा कॉफी
DIL ने ऑक्टोबर २०२१ मध्ये Costa Coffee सोबतच्या कराराचे नूतनीकरण केले. भारतात कॅफे मार्केट FY२० मध्ये ₹१० बिलियन होते. या सेगमेंट मध्ये स्पर्धा मर्यादित आहे. CCD सारखा ब्रँड यात संघर्ष करत आहे फक्त स्टारबक्स हा इंटरनॅशनल ब्रँड सतत विस्तार करत आहे.
DIL दरवर्षी सुमारे 30-40 स्टोअर्स वाढवण्याच्या तयारीत आहे. स्टारबक्सच्या तुलनेत, कोस्टाची किंमत कमी आणि अधिक परवडणारी आहे. डीआयएलची अपेक्षा आहे की कोस्टा फायदेशीर राहतील. जास्त लोकसंख्या असलेल्या भागात लहान स्टोअर्स आणि किऑस्कद्वारे विस्तार करण्यावर त्यांचा अधिक भर आहे.

सध्या कोस्टा ₹२५-३०,००० च्या ADS सह कार्य करते आणि त्याचे ग्रॉस मार्जिन ८०% इतके जास्त आहे.

DIL ही सर्वात वेगाने वाढणारी QSR आहे. दुसरी कोविड लाट असूनही, H१FY२२ मध्ये DIL ने १०० पेक्षा अधिक नवीन स्टोअर चालू केले आहेत. गेल्या ४ तिमाहीत २०० पेक्षा अधिक स्टोअर्सची भर पडली आहे. भविष्यातही हा दर कायम ठेवण्याची कंपनीची योजना आहे.

DIL ने मार्जिनमध्ये सुधारणा केल्याने कॅश फ्लो चांगला होणे अपेक्षित आहे. DIL साधारणपणे ₹११/स्टोअरचे सरासरी कॅपेक्स खर्च करते. यामुळे प्रत्येक वर्षी २५०+ स्टोअर्स जोडण्यासाठी एकूण ₹२.५-३ बिलियनचा खर्च येईल.

आता DIL मध्ये गुंतवणूदारांसाठी असलेला धोका सुद्धा समजून घेऊ
योजनांची अंमलबजावणी कमकुवत असल्याने कमी युनिट जोडले जाताय.
चिकन स्पेसमध्ये वाढती स्पर्धा: WLDL आणि JUBILANT फ्राईड चिकन मार्केटमध्ये त्यांचा ब्रँड वाढवण्याच्या दृष्टीने नवीन योजना आखत आहेत.

DLIs शेअरहोल्डिंग:
१) ६२.९१% – प्रमोटर्स
२) ७.८२% – FII
३) ४.९२% – DII
४) २४.३५% – इतर

काही वर्षांच्या सुमार कामगिरीनंतर आता DIL च्या तिमाही निकालात सुधारणा दिसून येत आहे. ज्याचे श्रेय प्रत्येक व्यवसायावर स्वतंत्र लक्ष बिजनेस चे रिमॉडेलिंग आणि मॅनेजमेंट घेतलेल्‍या निर्णयांना जाते. तर आखलेल्या योजनांची अंमलबजावणी संथ गतीने झाली तर मात्र ते गुंतवणूकदारांनासाठी काळजीचे कारण असू शकते.

आता एक नजर टेक्निकल वर सुद्धा टाकू…
मागील काही दिवसात स्टॉक १९०+ पासून जवळपास १४० पर्यंत पडला होता. पैसापाणीने दिवाळीत १४० ला हा स्टॉक लाँग टर्म साठी दिला होता. अजून सुद्धा स्टॉक चांगल्या व्हॅल्युएशन मध्ये आहे. स्टॉक ला १४० हा विकली क्लोझिंगचा चांगला सपोर्ट आहे. काल स्टॉक ६% अप होता तुम्ही १४० पर्यंत हा स्टॉक ॲड करू शकता आणि ११२ चा क्लोझिंग बेसिस वर स्टॉप लॉस ठेवू शकता.

Comments are closed.