एलायसीच्या आयपीओला अप्लाय करताना पेटीएम, झोमॅटोकडून बोध घ्या

एलआयसीचा आयपीओ येणार येणार म्हणून अनेक महिने प्रतीक्षेत असलेल्या इन्व्हेस्टर्सला शेवटी ही बातमी मिळाली. मार्च महिन्यात आयपीओ येणार असे वाटत असताना रशिया युक्रेन युद्धाचा मार्केटवर परिणाम झाला. त्यामुळे बहुधा एलआयसीचा आयपीओसुद्धा सध्या लांबणीवर गेला आहे. हा आयपीओ कधी येईल याबाबत सध्यातरी फक्त अंदाज वर्तवले जात आहेत.
आयपीओ येईल तेव्हा येईल पण एलआयसीच्या आयपीओला अप्लाय करताना काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे.

 

१. कंपनीचे व्हॅल्यूएशन आणि फंडामेंटल्स

कुठल्याही कंपनीच्या आयपीओला अप्लाय करताना या दोन घटकांचा विचार केलाच पाहिजे. सध्या मार्केटमध्ये कसला ट्रेंड आहे याचा विचार करून आयपीओला अप्लाय करणे योग्य नाही. एक उदाहरण बघू.

२०२१ मध्ये टेक्नॉलॉजी थीमच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. पण याचा फायदा सगळ्याच कंपन्यांना झाला का? नाही. पेटीएम, कारट्रेड, पिबी फिनटेक या कंपन्यांच्या शेअरची सध्याची किंमत त्यांच्या आयपीओ प्राईजपेक्षा बरीच खाली आहे.

कंपनीच्या फंडामेंटलचा शेअरच्या किमतीवर परिणाम होतच असतो.  म्हणजे बघा, मार्केटमध्ये पडझड झाली तर फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपन्यांचे शेअर पडतात, पण तितकेच लवकर ते रिकव्हरीसुद्धा देतात. हेच जर फंडामेंटल विक असलेल्या कंपन्यांच्या बाबतीत झालं तर त्यांचे शेअर भरपूर खाली येतात आणि पुन्हा वर येण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. यामुळे अशा शेअर्स मध्ये इन्व्हेस्टर्स बराच काळ अडकून राहू शकतात.

पेटीएम सारख्या नव्या कंपन्यांनी काय केलं माहितीये का?
यांनी जास्तीत जास्त कस्टमर्स मिळवण्याकडे लक्ष दिलं. त्या तुलनेत प्रॉफिफिटेबल राहण्याकडे तुलनेने कमी लक्ष दिलं. या कंपन्याचे व्हॅल्यूएशन खूप जास्त होते. मुळात या कंपन्यां स्टार्टअप असल्याने हे व्हॅल्यूशन योग्य आहे किंवा नाही हे तपासायला योग्य असा मार्गही नव्हता.

 

२. कंपनीचे नाव परिचयाचे असणे म्हणजे बिझनेस माहित असणे असा समज 
बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कंपनीचं नाव माहित असतं. कारण रोजच्या व्यवहारात आपला सातत्याने त्याच्याशी संबंध येत असतो. आता झोमॅटो किंवा पेटीएमचंच बघा ना. ह्या दोन कंपन्या आपल्याला अगदी चांगल्या माहित आहेत कारण आपण झोमॅटोवरून ऑर्डर करतो, पेटीएमचा वापर करून पेमेंट करतो. पण याचा अर्थ या कंपन्यांचा बिझनेस आपल्याला कळतो असा होतो का? तर नाही. इथे तुम्ही फक्त कंपनीशी फॅमिलीयर आहात. पण म्हणून तुम्हाला या कंपन्यांची प्रॉफीटॅबिलिटी, प्रॉफिट मार्जिन्स, फ्युचर ग्रोथ याबद्दल माहिती असेलच असे नाही.
या दोन कंपन्यांच्या तुलनेत गेल्यावर्षी आयपीओ आलेल्या आणखी दोन कंपन्यांचं उदाहरण बघू. क्लीन सायन्स, सोना बीएलडब्ल्यू या कंपन्यांच्या आयपीओने चांगली कामगिरी केली. कंपन्यांचे शेअर्स अजूनही चांगला परफॉर्मन्स देत आहेत. याला कारण म्हणजे त्यांचा बिझनेस. झोमॅटो, पेटीएमच्या तुलनेत इन्व्हेस्टर्स या कंपन्यांशी फॅमिलीयर नव्हते पण त्यांनी या कंपन्यांचा अभ्यास करून त्यांचा बिझनेस समजून घेतला असता तर निश्चितच फायदा झाला असता.

 

३. आयपीओला अप्लाय करायचे नेमके कारण, लिस्टिंग गेन्स की इन्व्हेस्टमेंट?
बऱ्याच रिटेल इन्व्हेस्टर्सचा यात घोळ होतो. जर तुम्ही लिस्टिंग गेनसाठी अप्लाय करत असाल तर अगदी २-३% गेन मिळाला तरी तुम्ही प्रॉफिट बुक करून बाहेर पडले पाहिजे. प्रत्येक आयपीओला १०,२०% लिस्टिंग गेन मिळेलच असेल नाही. तुम्ही अप्लाय केलेला आयपीओचे  डिस्काऊंट लिस्टिंगसुद्धा होऊ शकते. अशा वेळी स्टॉप लॉस असणे फार गरजेचे आहे. आपण किती पैसे गमावलेले चालेल हे आधीच ठरवून घेतले पाहिजे. हा स्टॉप लॉस १०,२०% किती ठेवायचा हा निर्णय तुम्ही तुमच्या रिस्क कॅपॅसिटी नुसार घेतला पाहिजे.
लिस्टिंग गेनसाठी अप्लाय केलेल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून टिकून राहणे असे करू नका. आपला निर्णय साफ ठेवा.

 

४. लॉस बुकिंगमधून प्रॉफिट – पैसापाणीचा फुकट पण मोलाचा सल्ला
तुमच्याकडे आयपीओमध्ये मिळालेले पण आता लॉसमध्ये असलेले स्टॉक्स असतील तर त्याचा फायदा कसा करून घ्याल? हे स्टॉक्स ३१ मार्चच्या आत विकून लॉस बुक करा. या आर्थिक  वर्षात तुम्हाला झालेल्या नफ्यातून हा लॉस वजा होऊन उरलेल्या रकमेवर फक्त इन्कम टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच तुमची टॅक्स लायबिलिटी कमी होईल.

Comments are closed.